नवी दिल्ली : कोरोना व्हायरसवरील औषध तयार करण्यासाठी भारतासह जगातील अनेक देश कंबर कसून दिवस-रात्र एक करत आहेत. या महामारीची लस एका वर्षात तयार होईल, असा दावाही केला जात आहे. मात्र अशातच, पतंजली आयुर्वेदचे संस्थापक आचार्य बालकृष्ण यांनी एक नवा दावा केला आहे.
1 हजार हून अधिक रुग्ण बरे -आचार्य बालकृष्ण यांनी दावा केला आहे, की पंतजलीने कोरोनावरील औषध तयार करण्यात यश मिळवले आहे. एवढेच नाही, तर या औषधाने 1 हजार हून अधिक रुग्ण बरे झाले असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. वेगवेगळ्या ठिकाणी अनेक कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना हे औषध देण्यात आले. यांपैकी 80 टक्के लोक ठणठणीत झाले आहेत, असेही बालकृष्ण म्हणाले.
परिक्षणच नाही, औषधही तयार -आचार्य बालकृष्ण म्हणाले, कोरोना महामारी चीनसह संपूर्ण जगात पसरताच आपण आपल्या संस्थेतील प्रत्येक विभागाला केवळ आणि केळव कोरोनावरील उचारासाठी उपयोगी पडेल, अशा औषधांवर काम करण्याच्या कामाला लावले. याचा परिणाम आज समोर आला आहे. तसेच, या औषधाचे केवळ यशस्वी परिक्षणच केले गेले नाही, तर है औषधही तयार करण्यात आले आहे.
बालकृष्ण यांनी सांगितले असे तयार करण्यात आले औषध -आचार्य बालकृष्ण म्हणाले, शास्त्र आणि वेदांचा अभ्यास करून, त्यांना विज्ञानाच्या कसोटीवर ठेवून आयुर्वेदिक गोष्टींचा अभ्यास करून हे औषध तयार करण्यात आले आहे. ते म्हणाले, हे औषध तयार करण्यासाठी पतंजलीचे शेकडो वैज्ञानिक दिवस-रात्र एक करून काम करत होते.
पतंजली संशोधन केंद्राचे मुख्य वैज्ञानिक म्हणाले - पतंजली संशोधन केंद्राच्या मुख्य वैज्ञानिकाने सांगितल्यानुसार, चीनमध्ये कोरोनाची सुरुवात होताच, जानेवारी महिन्यात आम्ही कामाला लागलो होते. शेकडो वैज्ञानिकांनी दिवस-रात्र काम केले. या कठोर परिश्रमामुळेच आम्ही हे औषध तयार केले आहे. या औषधाने हजारावर रुग्ण बरे झाले आहेत.
यापूर्वी, माझ्याकडे कोरोना बरा करण्याचा उपाय आहे. माझ्याकडे असलेले औषध १०० टक्के गुणकारी आहे, असा दावा पतंजलीचे संस्थापक बाबा रामदेव यांनी बुधवारी केला होता.