नवी दिल्ली - देशात कोरोनाचा धोका वाढला आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा 32,34,475 वर गेला आहे. देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 67,151 नवे रुग्ण आढळले आहेत. तर 1,059 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 59,449 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याच दरम्यान अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. तेलंगणामध्येही अशीच एक घटना घडली आहे. एक पोस्टमन कोरोनाचा 'सुपर स्प्रेडर' ठरला आहे.
एका पोस्टमनमुळे गावातील तब्बल 100 हून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तेलंगणामधील एका गावात पेन्शन वाटप करणाऱ्या व्यक्तीमुळे कोरोनाचा प्रसार झाल्याची माहिती मिळत आहे. गेल्या 10 दिवसांत गावात कोरोनाचे तब्बल 102 नवे रुग्ण आढळून आले आहेत. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. दहा दिवसांपूर्वी गावात जिल्हा मुख्यालयातून एक पोस्टमन आला होता. तेव्हापासून कोरोनाचा प्रसार होण्यास सुरुवात झाल्याचं म्हटलं जात आहे.
पोस्टमनने सर्वात आधी ज्यांना पेन्शन वाटप केलं होतं त्या लोकांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आणि त्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांच्या कोरोना चाचणीचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. गावकऱ्यांनी सुरक्षेचा उपाय म्हणून गावात लॉकडाऊन घोषित केला आहे. गावात एकूण 21 कंटेनमेंट झोन तयार करण्यात आले आहेत. तर जिल्ह्यात गेल्या एका आठवड्यात 337 नवे करोना रुग्ण आढळल्याची माहिती मिळत आहे.
गावातील लोकांना कोरोनाची लागण झाल्यानंतर गावात मोठ्या प्रमाणात कोरोनाच्या चाचण्या करण्यात येत आहेत. तेलंगणाच्या आरोग्य मंत्र्यांनी कोरोनामुक्त झालेल्या दोन आरोग्य कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा कोरोनाची लागण झाली असल्याचं स्पष्ट केलं आहे. तेलंगणामध्ये 1,11,688 कोरोना रुग्ण आढळले असून 780 जणांचा मृत्यू झाला आहे. एका इंग्रजी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. याआधी काही दिवसांपूर्वी आंध्र प्रदेशमध्ये एक फोटोग्राफर कोरोना सुपर स्प्रेडर ठरला होता.
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : 'या' अवयवांना कोरोनाचा सर्वाधिक धोका, पोस्टमॉर्टममधून धडकी भरवणारा खुलासा
माणुसकीला काळीमा! दंड न भरल्याने पंचांनीच केला महिलेवर सामूहिक बलात्कार
काय सांगता? जगातील सर्वात स्वस्त मोबाईल डेटा भारतात; तर 'या' देशात आहे सर्वात महाग
मेड इन चायनाचा 'या' देशाला बसला मोठा फटका; 3700 निरोगी लोकांना दाखवलं 'कोरोना पॉझिटिव्ह'
CoronaVirus News : देशात कोरोनाचा वेगाने प्रसार होण्यामागे 'हे' आहे कारण, ICMR ने दिला गंभीर इशारा