बंगळुरू - देशात कोरोनाचा धोका वाढला असून गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ झाली आहे. तसेच चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. रुग्णांचा आकडा तब्बल 11 लाखांच्या वर गेला आहे. 24 तासांत कोरोनाचे 40,425 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 681 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 11 लाख 18 हजार 43 वर पोहोचली आहे. याच दरम्यान अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत.
देशातील विविध रुग्णालयात कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरू आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचे सर्व उपाय केले जात असतानाच कर्नाटकातील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका कोविड-19 रुग्णालयात डुक्करांचा कळप मुक्तपणे संचार करत असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कलबुर्गीतील एका सरकारी कोरोना रुग्णालयात चक्क डुक्करांचा एक कळप मुक्तपणे फिरताना दिसत आहे. डुक्करांचा रुग्णालयात फिरतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.
कोरोना रुग्णालयात फिरत असलेल्या डुक्करांना कोणीही रुग्णालयाच्या बाहेर काढले नाही. सर्वजण ही परिस्थिती पाहत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यावर रुग्णालय प्रशासनाच्या निष्काळजीपणावर टीकेची झोड उठली आहे. व्हिडिओमुळे हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कर्नाटकात कोरोनाचे एकूण 59 हजार 752 रुग्ण आढळून आले आहेत. तर 1240 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून 21 हजार लोक बरे देखील झाले आहेत. कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी विशेष काळजी घेतली जात असताना कलबुर्गीतील या भयंकर प्रकाराने सर्वांनाच धक्का बसला आहे.
देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा तब्बल 11 लाखांच्या वर गेला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सोमवारी (20 जुलै) दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 40,425 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 681 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 11 लाख 18 हजार 43 वर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 27,497 वर पोहोचला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 3,90,459 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 7,00,087 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
Assam Floods : आसामला पुराचा तडाखा, तब्बल 110 जणांचा मृत्यू
CoronaVirus News : इथे ओशाळली माणुसकी! ...अन् रुग्णालयाबाहेर भर पावसात कित्येक तास पडून होती महिला