नवी दिल्ली - जगभरात कोरोनाचा वेगाने प्रसार झाला असून अनेक देश त्याला रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही दिवसागणिक वाढत आहे. कोरोना रुग्णांची संख्या ही एक लाखांच्या वर गेली असून तीन हजार हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. मात्र कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात भारत बऱ्यापैकी यशस्वी झाला आहे. इतर देशांच्या तुलनेत कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात भारताला यश आले आहे. विशेष म्हणजे कोरोनाच्या या लढ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी इतर देशांनाही सहाय्य करत असल्याने त्यांचं कौतुक होत आहे. याच दरम्यान पंतप्रधान मोदी यांनी एक ट्विट केलं आहे.
आयुष्मान भारत या आरोग्य सेवा योजनेने एक कोटी लाभार्थ्यांचा आकडा ओलांडला आहे. या मोहिमेच्या यशाबद्दल मोदींनी डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्य सेवा कर्मचार्यांचे कौतुक केले आहे. 'दोन वर्षांपेक्षा कमी कालावधीत आयुष्मान भारतने मोठे यश संपादन केले आहे. या मोहिमेचा अनेकांच्या जीवनावर सकारात्मक परिणाम झाला आहे. या योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या ही एक कोटी इतकी झाली असून जगातील सर्वात मोठी आरोग्य सेवेची योजना ठरली आहे' असं ट्विट पंतप्रधानांनी केलं आहे.
नरेंद्र मोदी यांनी बुधवारी (20 मे) आपल्या ट्विटर अकाऊंटवरन ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. 'आम्ही आमच्या डॉक्टर, परिचारिका, आरोग्य कर्मचारी आणि आयुष्मान भारतशी संबंधित असलेल्या सर्वांचे कौतुक करतो. त्यांच्या प्रयत्नांमुळे ही योजना जगातील सर्वात मोठी आरोग्य सेवा बनली आहे. या उपक्रमामुळे बर्याच भारतीयांचा, विशेषत: गरीब आणि दलितांचा विश्वास जिंकला आहे. आयुष्मान भारत लाभार्थ्यांच्या संख्येने एक कोटीचा आकडा ओलांडल्याचा प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल. दोन वर्षांपेक्षा कमी कालावधीत, या उपक्रमाचा बर्याच लोकांवर सकारात्मक परिणाम झाला आहे. मी सर्व लाभार्थी व त्यांच्या कुटुंबियांचे अभिनंदन करतो. त्यांच्या आरोग्यासाठीही मी प्रार्थना करतो' असं मोदींनी म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : काय सांगता? संगीत ऐकून कोरोनाग्रस्त बरे होणार; 'ही' थेरेपी फायदेशीर ठरणार
CoronaVirus News : बापरे! मास्क न लावल्यास अटक होणार; 'या' देशाने घेतला मोठा निर्णय
CoronaVirus News : धक्कादायक! लॉकडाऊननंतर चिमुकल्यांची होईल भयानक अवस्था?; नोबेल विजेते म्हणतात...
CoronaVirus News : "सरकारचा 'हा' निर्णय दिल्लीकरांसाठी डेट वॉरंट ठरू शकतो"
Lockdown 4.0 : प्रवासासाठी ई-पास काढायचाय?; धावाधाव नको, केंद्राची 'ही' वेबसाईट करेल मदत
CoronaVirus : फक्त 12 दिवसांत देशातील रुग्णांची संख्या दुप्पट; कोरोनाचा धक्कादायक ग्राफ