नवी दिल्ली - देश सध्या कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. तर दुसरीकडे देशातील काही राज्यात पावसाने थैमान घातले असून पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत असून नद्यांना पूर आला आहे. अशा परिस्थितीत लोकांना आरोग्यविषयक समस्यांचा सामना करावा लागत आहे. मात्र पोलीस आणि वैद्यकिय कर्मचारी रुग्णांची अहोरात्र सेवा करत आहे.
आपल्या जीवाची पर्वा न करता रुग्णांना मदत करण्यासाठी तत्पर असलेले पाहायला मिळत आहेत. अशीच एक कौतुकास्पद घटना समोर आली आहे. पोलिसांनी रुग्णाला रुग्णालयात सुखरूपरित्या नेण्यासाठी पुराच्या पाण्यात होडीला रुग्णवाहिका केली आहे. रुग्णासाठी पोलिसांनी केलेल्या या कार्याचं सर्वत्र भरभरून कौतुक होत आहे. या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. तसेच पोलीस रुग्णाला होडीतून घेऊन जाताना दिसत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, आंध्र प्रदेशच्या गोदावरी जिल्ह्यातील डोड्डावरम या गावामध्ये पुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. जनजीवन विस्कळीत झालं आहे. अशा परिस्थितीमध्ये कोरोनाच्या रुग्णांना रुग्णालयापर्यंत पोहोचवणं अशक्य झालं होतं. यावेळी पोलिसांनी चक्क होडीची रुग्णवाहिका करून रुग्णांना रुग्णालयापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था केली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
काही दिवसांपूर्वी कडनाई गावातील महिलेला प्रसूती कळा येऊ लागल्याने रुग्णालयात दाखल करणं गरजेचं होतं. मात्र रस्त्यांअभावी गावापर्यंत रुग्णवाहिका येऊ शकत नव्हती. त्यामुळे गावकऱ्यांनी कावड केली आणि महिलेला टोपलीत बसवून नेले. रुग्णवाहिका नसल्याने गर्भवती महिलेला नदी पार करून काही गावकऱ्यांनी रुग्णालयात नेल्याची घटना घडली होती. छत्तीसगडच्या सरगुजा जिल्ह्यात ही घटना घडली होती.
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : रशियानंतर 'या' देशाने तयार केली कोरोना लस; आपत्कालीन स्थितीत 2 लसींना मंजुरी
'दाऊदला कोणत्याही परिस्थितीत भारतात आणा', रोहित पवारांनी मोदींकडे केली मागणी
CoronaVirus News : स्वत:वर कोरोना लसीची चाचणी करायचीय?, 'या' आहेत अटी, जाणून घ्या नेमकं कसं असणार?
Bihar Elections 2020 : बिहार निवडणुकीसाठी देवेंद्र फडणवीस सज्ज; भाजपा कार्यकारणीशी साधला संवाद