मदुराई : कोरोना व्हायरसने संपूर्ण जगात थैमान घातले आहे. कोरोनाविरोधातील या लढाईत भारतातील लहानांपासून-मोठ्यांपर्यंत, श्रीमंतांपासून-गरिबांपर्यंत सर्वच वर्गातील लोक कंबर कसून तयार आहेत. ही लढाई धैर्याने लढण्यासाठी सर्वच जण मदतीचा हात समोर करत आहेत. विशेष म्हणजे भिक्षा मागणारे साधकही यात मागे नाहीत. तामिलनाडूतील भिक्षा मागून आपली दिनचर्या चालवणाऱ्या एका साधकाने आता कोरोना मदत निधीत हजारो रुपायंचे दान केले आहे.
भिक्षा मागणाऱ्या या साधकाचे नाव आहे, पूलपांडियान (Poolpandiyan). ते मदुराई येथील एका मंदिरासमोर बसून रोज भिक्षा मागतात. त्यांनी सोमवारी मदुराईचे जिल्हाधिकारी टीजी विनय यांची भेट घेतली आणि त्यांच्याकडे राज्य सरकारच्या कोरोना मदत निधीमध्ये 10 हजार रुपये दान दिले.
CoronaVirus News: बापरे! कोरोनाचे नियम तोडले तर 'हा' मुस्लीम देश देणार जगातील सर्वात मोठी शिक्षा
यावेळी पूलपांडियान म्हणाले, हे दान त्यांनी एजुकेशन फंडासाठी दिले असते, मात्र आता ते कोरोना मदत निधीत दिले आहे. कारण आज कोरोनाच सर्वात मोठा मुद्दा आहे.
तामिलनाडूत आज 536 नवे कोरोनाबाधित सापडले आहेत. तर 3 जणांचा मृत्यू झाला आहे. आता राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 11,760वर पोहोचला आहे. यात 7,270 सक्रिय रुग्णांचा तर 81 मृतांचा समावेश आहे.
आणखी वाचा -
जगातील 10 सर्वात भयंकर चक्रीवादळं; यांच्या विनाशाचे तांडव आठवले, की आजही उडतो लोकांचा थरकाप
CoronaVirus News : एका तासात 250 जणांची कोरोना तपासणी, टेस्टिंग किटपेक्षाही वेगवान श्वान!
CoronaVirus News: WHOमध्ये भारताला मोठे पद; चीनवर निशाणा, भारतावर सर्वांच्या नजरा