CoronaVirus News : 'या' गावात मुस्लीम व्यापाऱ्यांना प्रवेश नाही, पोस्टर लावल्याने खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2020 07:21 PM2020-05-03T19:21:03+5:302020-05-03T19:31:53+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates: इंदूरच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी याप्रकरणी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार, या पोस्टरची माहिती समजताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहचत हे पोस्टर हटवलं आहे.
कोरोना वाढता संसर्ग रोखण्यासाठी 17 मे पर्यंत देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. मात्र अशा संघर्ष काळात काही अशा घटना समोर येत आहे ज्यामुळे समाजात जातीय तेढ निर्माण केले जात आहे. काही दिवसांपूर्वी एका भाजपा आमदाराचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. यामध्ये उत्तर प्रदेशच्या देवरिया जिल्ह्यातील बरहज विधानसभा मतदारसंघाचे भाजपाचे आमदार सुरेश तिवारी यांनी मुस्लिमांकडून भाज्या खरेदी करू नका असं म्हटलं होतं. त्यानंतर आता मध्य प्रदेशमधूनही अशीच एक घटना समोर आली आहे.
मध्य प्रदेशातील पेमलपूर या गावात मुस्लीम व्यापाऱ्यांना गावात प्रवेश नाही असं पोस्टर झळकलं आहे. इंदूरच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी याप्रकरणी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार, या पोस्टरची माहिती समजताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत हे पोस्टर हटवलं आहे. अज्ञात व्यक्तीविरोधात हे पोस्टर लावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र हे पोस्टर हटवण्यात आले असले तरी सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाले आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी यावरून मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. एका हिंदी वेबसाईटनेे याबाबतचे वृत्त दिले आहे.
क्या यह कृत्य प्रधान मंत्री मोदी जी की अपील के विरुद्ध नहीं है? क्या यह कृत्य हमारे क़ानून में दण्डनीय अपराध नहीं है? मेरे ये प्रश्न मुख्य मंत्री शिवराज चौहान जा व मप्र पुलिस से हैं। समाज में इस प्रकार का विभाजन-बिखराव देश हित में नहीं है। https://t.co/rGV1qD2UXh
— digvijaya singh (@digvijaya_28) May 3, 2020
काही दिवसांपूर्वी जमशेदपूरच्या फळांच्या दुकानांवर विश्व हिंदू परिषदेच्या पोस्टर्सची छायाचित्रे समोर आली आहेत. या पोस्टरमध्ये हिंदू फळांचे दुकान लिहिलेले आहे आणि ते दुकानाच्या बाहेर लावण्यात आलं आहे. पोस्टरबाबत जमशेदपूर पोलिसांनीही लोकांवर गुन्हे दाखल केले आहेत. मेरठमधील व्हॅलेंटीस कर्करोग रुग्णालयाने अशी जाहिरात प्रकाशित केली आहे की ज्यांची कोरोनाची चाचणी घेण्यात आली आहे त्याच मुस्लिमांनी यावे. मुंबईत एका व्यक्तीने मुसलमान असल्याने मुलाकडून डिलिव्हरी सामान घेण्यास नकार दिला. याशिवाय दिल्लीचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यात भाजीपाला किंवा इतर हाताळणी करणारे आधार कार्ड पाहून एन्ट्री दिली जात आहे.
CoronaVirus News : 'असहाय्य मजुरांकडून पैसे घेणं लज्जास्पद'; अखिलेश यादव यांचं मोदी सरकारवर टीकास्त्रhttps://t.co/NQpoFl4CI1#coronaupdatesindia#akhileshyadav#modigovernment
— Lokmat (@MiLOKMAT) May 3, 2020
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : 500 रुपयांसाठी त्या आजींनी रात्रभर केला 50 किमी पायी प्रवास पण....
CoronaVirus News : 1200 मजुरांना घेऊन वसई रोड ते गोरखपूर अशी पहिली विशेष ट्रेन रवाना!
भयंकर! BSF जवानाकडून आधी अधिकाऱ्याची हत्या, नंतर केली स्वत: आत्महत्या
बापरे! Reliance Jio च्या लाखो युजर्सचा डेटा ऑनलाईन लीक