CoronaVirus News : प्रियंका गांधींनी श्रमिक ट्रेन्सबाबत केलेल्या ट्विटला रेल्वेने दिलं उत्तर; म्हटलं...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2020 03:59 PM2020-06-01T15:59:42+5:302020-06-01T16:04:28+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates: देशभरात अडकलेल्या गरीब मजुरांना सोडण्यासाठी सध्या श्रमिक विशेष रेल्वे सुरू आहेत.
नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही एक लाख 90 हजारांवर गेली आहे. तर पाच हजारांहून अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. देशभरात अडकलेल्या गरीब मजुरांना सोडण्यासाठी सध्या श्रमिक विशेष रेल्वे सुरू आहेत. यानंतर रेल्वेनं देशभरात मेल एक्स्प्रेस ट्रेन्स सुरू करणार असल्याची माहिती रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी दिली होती. 1 जूनपासून दररोज 200 स्पेशल रेल्वे गाड्या वेळापत्रकानुसार सोडल्या जाणार आहेत. तसेच मजूर, विद्यार्थी, पर्यटक, तीर्थस्थळांवर अडकलेले यात्रेकरू या विशेष ट्रेनने घरी पोहोचत आहेत.
काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी याच दरम्यान श्रमिक ट्रेन्स संदर्भात एक ट्विट केलं आहे. श्रमिक रेल्वे गाड्यांमध्ये 80 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक ठिकाणी रेल्वे गाड्याही उशिरा पोहोचत आहेत. मजुरांसोबत अशा पद्धतीची वागणूक योग्य नाही असं ट्विट प्रियंका यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून केलं आहे. त्यांच्या या ट्विटला रेल्वेने उत्तर दिलं आहे. रेल्वे प्रशासनाने ट्विट करत प्रियंका यांना तथ्य तपासून घेण्याची विनंती केली आहे.
'श्रमिक रेल्वे गाड्यांमध्ये 80 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 40 टक्के ट्रेन उशिराने धावत आहेत. अनेक ट्रेन दुसऱ्या ठिकाणीही पोहोचल्या आहेत. ही प्रवाशांना मिळणारी वागणूक योग्य नाही. या दरम्यान काही लोकांना रेल्वेनं प्रवास करू नका हे सांगणे आश्चर्यकारक आहे. श्रमिकांसोबत अधिक संवेदनशीलतेने वागणं आवश्यक आहे' असं ट्विट प्रियंका गांधी यांनी केलं होतं.
रेल्वे मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी प्रियंका यांना ट्विटने उत्तर दिलं आहे. 'कृपया सर्वप्रथम तथ्य तपासून पाहा. श्रमिकांसाठी सुरू करण्यात आलेल्या विशेष रेल्वे या सुपरफास्ट ट्रेनपेक्षाही अधिक वेगाने धावत आहेत. फक्त काही दिवसांसाठी एका सेक्शनवर अधिक ट्रेन असल्यामुळे काही रेल्वे गाड्या डायव्हर्ट करण्यात आल्या होत्या. कोणत्याही रेल्वे गाड्या आपल्या मार्ग चुकल्या नव्हत्या' असं ट्विट रेल्वेने केलं आहे.
CoronaVirus News : लॉकडाऊननंतर शाळांमध्ये असू शकते अशी परिस्थितीhttps://t.co/feNpXhx6k0#CoronaUpdatesInIndia#schoolsreopening#Students#education
— Lokmat (@MiLOKMAT) June 1, 2020
CoronaVirus News : कारण ऐकून कराल भरभरून कौतुक https://t.co/F2TvY6XhOY#CoronaUpdatesInIndia#CoronavirusIndia#CoronaWarrior
— Lokmat (@MiLOKMAT) June 1, 2020
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : लॉकडाऊननंतर शाळेमध्ये शिकवण्याच्या पद्धतीत होऊ शकतात 'हे' बदल
CoronaVirus News : कौतुकास्पद! ...म्हणून नवजात बाळाला नर्सने पाजलं दूध; तुम्हीही कराल सलाम
काय सांगता? पोलीस ठाण्यात चक्क पोपटांनी साक्ष दिली अन् निर्णयही झाला
CoronaVirus News : भयंकर! जेवणात आढळला विंचू; क्वारंटाईन सेंटरमधील धक्कादायक प्रकार
"मरकजचा कार्यक्रम वेळीच रोखला असता तर आज ही वेळच आली नसती"