CoronaVirus News : 'रेल्वेच्या माध्यमातून कोरोनाचा प्रसार करण्याचा प्रयत्न', 'या' सरकारचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2020 11:35 AM2020-05-27T11:35:47+5:302020-05-27T11:36:00+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: केंद्रीय गृह मंत्रालयाने 'श्रमिक स्पेशल ट्रेन' सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला. मजूर, विद्यार्थी, पर्यटक, तीर्थस्थळांवर अडकलेले यात्रेकरू या विशेष ट्रेनने घरी पोहोचत आहेत.

CoronaVirus Marathi News railway super spreader corona kerala slams SSS | CoronaVirus News : 'रेल्वेच्या माध्यमातून कोरोनाचा प्रसार करण्याचा प्रयत्न', 'या' सरकारचा गंभीर आरोप

CoronaVirus News : 'रेल्वेच्या माध्यमातून कोरोनाचा प्रसार करण्याचा प्रयत्न', 'या' सरकारचा गंभीर आरोप

Next

नवी दिल्ली - कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी देशामध्ये 31 मे पर्यंत लॉकडाऊन सुरू आहे. कोरोना लॉकडाऊनमुळे हातावर पोट असलेले अनेक मजूर देशातील विविध भागात अडकून पडले आहेत. तसेच यापैकी अनेक जण मिळेल त्या मार्गाने आपल्या घरी परतण्यासाठी प्रयत्न करत आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयाने 'श्रमिक स्पेशल ट्रेन' सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला. मजूर, विद्यार्थी, पर्यटक, तीर्थस्थळांवर अडकलेले यात्रेकरू या विशेष ट्रेनने घरी पोहोचत आहेत. मात्र याच दरम्यान रेल्वेच्या माध्यमातून कोरोनाचा प्रसार करण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप हा केंद्र सरकारवर करण्यात आला आहे. 

कोणतीही पूर्वमाहिती न देता ट्रेन पाठवल्या जात असून यामुळे सरकारने कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी आखलेल्या नियमांचं उल्लंघन केलं जात असल्याचं केरळ सरकारने म्हटलं आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यासंबधी पत्र लिहिलं. तर दुसरीकडे राज्याचे अर्थमंत्री थॉमस यांनी रेल्वे केरळमध्ये कोरोनाचा प्रसार करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला आहे. थॉमस यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. 

'मुंबईहून गेल्या आठवड्यात एक ट्रेन आली. ट्रेन सुरू झाल्यानंतर आम्हाला सांगण्यात आलं. अनेक स्थानकांवर थांबलेल्या या ट्रेनमधील प्रवाशांकडे पास नव्हते. महामारीत हा भोंगळ कारभार सुरू आहे. रेल्वेला केरळमध्ये कोरोनाचा प्रसार करायचा आहे. जबाबदारीने वागा, किमान तुमच्या ट्रेनच्या माहिती तरी ठेवा' असं ट्विट करून अर्थमंत्री थॉमस यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. 

केरळमध्ये सध्या करोनाचे 896 करोना रुग्ण आहेत. महाराष्ट्रातून परतलेले 72 जण करोना पॉझिटिव्ह आढळले असून 71 जण तामिळनाडू तर 35 जण कर्नाटकहून परतलेले आहेत. जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून कोरोना रुग्णांचा आकडा हा तब्बल 1,51,767 वर गेला आहे. गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 6387 नवे रुग्ण आढळून आले आहेत तर 170 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबररदारीचे सर्व उपाय करण्यात येत आहेत. 

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : दिलासादायक! देश कोरोनाची लढाई जिंकणार, 'हा' नवा फॉर्म्युला फायदेशीर ठरणार?

CoronaVirus News : शाळा-कॉलेज कधी सुरू होणार?; केंद्रीय गृहमंत्रालयाने दिलं उत्तर

CoronaVirus News : बापरे! रेल्वे प्रवासात एकाच दिवशी 7 मजुरांचा मृत्यू; कारण वाचून व्हाल हैराण

CoronaVirus News : धक्कादायक! खासगी लॅबमध्ये कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह पण सरकारी लॅबमध्ये निगेटिव्ह

CoronaVirus News : चिंताजनक! कोरोनावर नियंत्रण मिळवलेल्या 'या' देशांत दुसऱ्या लाटेचा इशारा

CoronaVirus News : कडक सॅल्यूट! तब्बल 68 कोरोनाग्रस्तांच्या मृतदेहांवर 'या' योद्ध्याने केले अंत्यसंस्कार

Web Title: CoronaVirus Marathi News railway super spreader corona kerala slams SSS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.