शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
8
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
9
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
10
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
11
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
12
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
13
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
14
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
15
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
16
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
17
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
18
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
19
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
20
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?

CoronaVirus News: कृषी भवनात एका अधिकाऱ्याला कोरोनाची लागण, अन्न पुरवठा मंत्रालय सील 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2020 11:34 PM

एका अधिकृत निवेदनानुसार, 'मंगळवारपासून भवनाच्या  सॅनिटाइझेशनच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. हे  काम बुधवारपर्यंत चालेल. तोपर्यंत कृषी भवनाचा हा भाग सील राहील.' 

ठळक मुद्देअन्न पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांचे कार्यालय आणि अन्न पुरवठा मंत्रालयदेखील सील कृषि भवनात अन्न पुरवठा त्रालयासोबतच कृषि, ग्रामीण विकास आणि पंचायतीराज विभागाची कार्यालयेही आहेत.मंगळवारपासून भवनाच्या  सॅनिटाइझेशनच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे

नवी दिल्ली : नीती आयोग आणि शास्त्री भवनानंतर कोरोना व्हायरस आता कृषि भवनातही पोहोचला आहे. येथील एका अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. यानंतर अन्न पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांचे कार्यालय आणि अन्न पुरवठा मंत्रालयदेखील सील करण्यात आले आहे. कृषी भवनाचा हा भाग बुधवारपर्यंत पूर्णपणे सॅनिटाइझ केला जाईल. 

नवी दिल्ली येथील राजपथवर असलेल्या कृषि भवनात अन्न पुरवठा त्रालयासोबतच कृषि, ग्रामीण विकास आणि पंचायतीराज विभागाची कार्यालयेही आहेत. मत्स्य, पशुपालन व डेरी विभागाच्या एका अधिकाऱ्याला कोरोना झाल्याचे समोर आले आहे. यानंतर कृषी भवनातील अन्न व पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांचे कार्यालय आणि मंत्रालयाचा भाग पूर्णपणे सील करण्यात आला आहे. 

चीनची भीती! 'या'मुळे आता संपूर्ण जग देतंय भारताच्या पावलावर पाऊल, 'अशी' आखतंय रणनीती

एका अधिकृत निवेदनानुसार, 'मंगळवारपासून भवनाच्या  सॅनिटाइझेशनच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. हे  काम बुधवारपर्यंत चालेल. तोपर्यंत कृषी भवनाचा हा भाग सील राहील.' 

नीती आयोगाचे कार्यालयही सील -यापूर्वी, कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्यानंतर 28 एप्रिलपासून नीति आयोगाचे कार्यालयही बंद करण्यात आले आहे. तर पाच मेपासून शास्त्री भवनाचा एक मजलाही सील करण्यात आला आहे.

CoronaVirus News: चिंता वाढली! सध्या कोरोनावरील व्हॅक्सीन तयार होऊ शकणार नाही, WHOचे मुख्य वैद्यकीय अधिकारी म्हणाले...

लॉकडाऊनमध्ये ढील देणं दिल्लीला पडलं महागात -राजधानी दिल्लीत कोरोना व्हायरसला थोपवण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आलं आहे. पण दिल्लीतले मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनी लॉकडाऊनमधून नागरिकांना काहीसा दिलासा देण्याचा प्रयत्न केला. त्यानुसार काही प्रमाणात सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही सुरू केली आहे. दिल्लीमध्ये लॉकडाऊनमधून काही प्रमाणात सूट मिळणे आवश्यक असल्याचेही केजरीवाल यांनी सांगितले. मात्र, या सवलतीमुळे दिल्लीत 24 तासांत 500 नवे रुग्ण सापडले आहेत.

'ति'ने माझ्यावर 10 वर्ष 'बलात्कार' केला, युवकाने सांगितली अत्याचाराची कहाणी

देशात कोरोना बाधितांची संख्या एकलाखवरकेंद्रीय आरोग्य मंत्र्यांच्या वेबसाइटनुसार, देशातील कोरोनाबाधितांची संख्या आता 1,01,139 वर पोहोचली आहे. यात 39173 लोक उपचारानंतर ठणठणीत होऊन घरी परतले आहेत. देशाज जवळपास 58802 रुग्ण अॅक्टीव्ह आहेत. तर आतापर्यंत 3163 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे कोरोनाचा फैलाव झालेले अन्य युरोपीय देश आणि अमेरिकेच्या तुलनेमध्ये भारतातील कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंचा दरही कमी आहे. 

CoronaVirus News : आनंदाची बातमी! : कोरोनावरील औषध सापडलं; 'ही' अँटीबॉडी 100 टक्के गुणकारी, अमेरिकन कंपनीचा दावा

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCentral Governmentकेंद्र सरकारdelhiदिल्लीministerमंत्री