नवी दिल्ली - देशामध्ये कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे नवे 47,704 रुग्ण सापडल्याने देशभरातील आकडेवारीने तब्बल 14 लाखांचा टप्पा पार केला आहे. कोरोनाच्या रुग्णसंख्येत विक्रमी वाढ पाहायला मिळालेली असताना 654 मृत्यूही नोंदविले गेले आहेत. देशातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 14,83,157 वर गेला आहे. तर आतापर्यंत देशभरात 33,425 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. मात्र याच दरम्यान एक दिलासादायक माहिती समोर आली आहे.
भारतातील कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट म्हणजेच रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे 64.23% टक्के झाले आहे. तसेच देशातील 9 लाख लोकांनी कोरोनाची लढाई जिंकली आहे. 9,52,744 लोक उपचारानंतर बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या 4,96,988 लोकांवर उपचार सुरू आहेत. तर दुसरीकडे जगभरात तब्बल एक कोटी लोकांनी कोरोनावर मात केली आहे. 10,231,837 जणांनी कोरोनाविरुद्धचं युद्ध जिंकलं आहे. जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या 16,643,498 वर गेली असून 656,621 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.
कोरोना व्हायरसने संपूर्ण जगाला विळखा घातला असून अनेक ठिकाणी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. जगभरातील सर्वच देश या संकटाचा सामना करत असून कोरोनाचा उद्रेक झालेला पाहायला मिळत आहे. मात्र दुसरीकडे बरं होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण देखील सातत्याने वाढत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क, सोशल डिस्टंसिंग, क्वारंटाईनच्या माध्यमातून काळजी घेतली जात आहे. खबरदारीचे सर्व उपाय केले जात आहेत. अनेक देशांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.
जगभरात युद्धपातळीवर कोरोना व्हाययरसवर औषध आणि लस शोधण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अनेक ठिकाणी चाचण्यांना यश देखील आले आहे. कोरोनाने थैमान घातलेले असतानाच अनेक दिलासादायक घटना समोर येत आहे. जगभरात कोरोनासंदर्भात संशोधन सुरू असून शास्त्रज्ञांना यश मिळत आहे. याच दरम्यान कोरोनाच्या या लढ्याला आणखी एक मोठं यश मिळालं आहे. शास्त्रज्ञांना कोरोनाला रोखणारी तब्बल 21 औषधं सापडल्याची माहिती मिळत आहे. ही औषधं कोरोना व्हायरसचा प्रसार रोखू शकतात. सॅनफोर्ड बर्नहम प्रीबायस मेडिकल डिस्कवरी इन्स्टिट्यूट ऑफ अमेरिकेच्या शास्त्रज्ञांनी हे संशोधन केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : मोठं यश! कोरोनाला रोखणारी 21 औषधं सापडली; शास्त्रज्ञांचा दावा
CoronaVirus News : चिंताजनक! 6 आठवड्यात कोरोनाग्रस्तांमध्ये दुप्पट वाढ; WHOने बोलावली इमर्जन्सी बैठक
CoronaVirus News : लढ्याला यश! फक्त 400 रुपयांत होणार कोरोना टेस्ट, एका तासात येणार रिपोर्ट
CoronaVirus News : कडक सॅल्यूट! जंगलातून रस्ता पार करत 'ही' नर्स लोकांपर्यंत पोहचवते मोफत औषधं
काय सांगता? कोरोनाला दूर ठेवणारा Sanitizer Pen आला, लिहिताना हातही होणार स्वच्छ