नवी दिल्ली - जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. याच दरम्यान सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सामान्य नागरिकांसाठी एक खूशखबर आहे. दैनंदिन जीवनातील अनेक वस्तू या स्वस्त झाल्या आहेत. जीवनावश्यक वस्तुंच्या किंमती कमी झाल्या आहेत. मनीकंट्रोलने दिलेल्या वृत्तानुसार, तांदूळ, पीठ, डाळी, बटाटा, कांदा यासारख्या जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती कमी झाल्या आहेत. यावर्षी पिकांचे विक्रमी उत्पादन झाले मात्र दुसरीकडे मागणी कमी होत असल्याचे दिसून येत आहे.
ग्राहक व्यवहार मंत्रालय प्राईस मॉनिटरिंग सेलच्या आकडेवारीनुसार, 114 रुपये प्रतिकिलो दर मिळणाऱ्या उडीद डाळीची किंमत 108 रुपये प्रतिकिलोपर्यंत पोचली आहे. त्याचबरोबर मूग डाळीच्या किंमतीत गेल्या 1 महिन्यांत प्रति किलो 5 रुपयांची घट दिसून आली आहे. 31 रुपये प्रतिकिलोला मिळणाऱ्या टोमॅटोच्या किंमतीही 12 रुपयांनी कमी झाल्या आहेत. कोरोना संकटाच्या काळात जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती सतत कमी झाल्या आहेत. गेल्या 1 महिन्यात किंमतींमध्ये घट झालेली दिसून येत आहे.
तांदूळ, डाळ, खाद्यतेल, कांदे, बटाटे टोमॅटो स्वस्त झाले आहेत. 29 रुपये किलो असणारी तांदळाची किंमत एका महिन्यात 2 रुपयांनी घसरून 27 रुपये प्रतिकिलो झाली आहे. पीठाच्या किंमतीतही घट झाली आहे. त्याचबरोबर 86 रुपये प्रतिकिलो चना डाळीची किंमत 1 महिन्यात 76 रुपयांवर आली आहे. खाण्या-पिण्याच्या वस्तू स्वस्त होण्याचे कारण म्हणजे यावर्षी पिकांचे विक्रमी उत्पादन झाले आहे. कोरोना संकटामुळे आलेल्या अर्थव्यवस्थेतील मंदीमुळे मागणी कमी झाली आहे. त्याचबरोबर पिकांची निर्यात बंद झाल्याने किंमतीही खाली आल्या आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : कोरोनाच्या संकटात अमेरिका मैत्री निभावणार; भारताला 'ही' मदत करणार
CoronaVirus News : ...म्हणून चेन खेचून मजुरांनी काढला ट्रेनमधून पळ; रेल्वे स्थानकावर झाला गोंधळ
CoronaVirus News : कोरोनामुळे बाप-लेकाची ताटातूट! नवजात बाळाला पाहण्यासाठी 'तो' व्याकूळ झाला पण...
'या' कंपनीचे तब्बल 74 कर्मचारी करोडपती झाले; CEO चे पॅकेजही 39 टक्क्यांनी वाढले
CoronaVirus News : दिलासादायक! कोरोनाची लढाई लवकरच जिंकता येणार; 'हे' औषध प्रभावी ठरणार