नवी दिल्ली - जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. आतापर्यंत लाखो लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. भारतातही कोरोनाग्रस्तांचा आकडा हा दिवसेंदिवस वाढत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही 52 हजारांच्या वर गेली असून तब्बल 1700 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनामुळे देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. अनेक उद्योगांना लॉकडाऊनचा फटका बसला आहे. लॉकडाऊन अशाच पद्धतीने वाढत राहिला तर येणाऱ्या काळात मीठाची कमतरता भासण्याची शक्यता आहे.
इकॉनॉमिक टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, मीठाचे उत्पादन कमी झाले आहे. कारण कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे याठिकाणी काम करणारे मजूर घरी परतण्याच्या प्रयत्नात आहेत अशी माहिती देशाच्या किनारपट्टी भागात मीठाचे उत्पादन घेणाऱ्या लोकांनी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून देशाच्या विविध भागात अडकलेल्या मजूरांसाठी सरकारने खास श्रमिक ट्रेन चालवल्या, जेणेकरून हे मजूर आपापल्या घरी पोहोचतील. मजुरांच्या कमतरतेमुळे मीठाचे उत्पादन जवळपास बंद झाले आहे. लवकरच याचा परिणाम मीठाच्या पुरवठ्यावर देखील दिसण्याची शक्यता आहे.
मीठ बनवण्याची प्रक्रिया ऑक्टोबर ते जून या कालावधी दरम्यान केली जाते. तर सर्वात जास्त उत्पादन मार्च आणि एप्रिल महिन्यात होते. देशात तयार होणाऱ्या मीठापैकी 95 टक्के मीठाचे उत्पादन गुजरात, राजस्थान, आंध्रप्रदेश आणि तमिळनाडूमध्ये होते. उर्वरित उत्पादन महाराष्ट्र, ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये होते. दरवर्षी भारतामध्ये 200 ते 250 लाख किलो मीठाचे उत्पादन केले जाते. इकोनॉमिक टाइम्सला इंडियन सॉल्ट मॅन्यूफॅक्सर्स असोसिएशन (ISMA)चे प्रेसिडेंट भरत रावल यांनी दिलेल्या माहितीनुसार अर्धा मार्च महिना आणि पूर्ण एप्रिल महिना असाच निघून गेला. यामुळे खूप मोठे नुकसान झाले आहे.
मार्च आणि एप्रिलमध्ये सर्वाधिक उत्पादन होते. मीठाच्या उत्पादनामध्ये उन्हाळ्यातील एका महिन्यात झालेले नुकसान इतर इंडस्ट्रीमध्ये झालेल्या 4 महिन्यांच्या नुकसानाएवढे असते अशी माहिती भरत रावल यांनी दिली आहे. तसेच या नुकसानाची भरपाई होईल की नाही हे देखील माहीत नाही. आता आमच्याकडे केवळ 45 दिवस असून मीठ उत्पादनाचे चक्र हे 60 ते 80 दिवसांचं असतं असंही त्यांनी म्हटलं आहे. पुढील काही दिवसात आमचे उत्पादन नाही वाढले तर कठीण होईल. कारण आमचा ऑफ सीझन (पावसाळा) बफर स्टॉक एवढा जास्त नाही आहे. त्याचप्रमाणे लॉकडाऊन संपल्यानंतर इंडस्ट्रीजमध्ये सुद्धा मीठाची मागणी वाढेल असं रावल यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
विशाखापट्टणमनंतर आता छत्तीसगडच्या पेपर मिलमध्ये गॅस गळती
Vizag Gas Leak : आंध्र प्रदेशला सर्वोतोपरी मदत करणार; पंतप्रधान मोदींनी केली मुख्यमंत्र्यांशी चर्चा
लॉकडाऊनमध्ये SBI ने ग्राहकांना दिला अलर्ट! ...तर खातं होऊ शकतं रिकामं, वेळीच व्हा सावध
CoronaVirus News : कोरोनाचा धसका! ATMमधून पैसे काढायला घाबरता?, मग 'या' दुकानातून काढू शकता रक्कम
CoronaVirus News : योगी सरकारच्या निर्णयावर साक्षी महाराज नाराज; म्हणाले...
CoronaVirus News : 'कोरोना व्हायरसचा प्रसार वुहानच्या प्रयोगशाळेतून झाला'; अमेरिका ठाम