CoronaVirus News : मोठा निर्णय! 'या' राज्यात मोफत होणार कोरोना चाचणी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2020 09:25 AM2020-09-09T09:25:00+5:302020-09-09T09:40:19+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोना चाचणींचे प्रमाणही वाढवण्यात आले आहे. अशातच एका राज्याने कोरोना चाचणी संदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. 

CoronaVirus Marathi News shivraj singh chouhan government corona test free madhya pradesh | CoronaVirus News : मोठा निर्णय! 'या' राज्यात मोफत होणार कोरोना चाचणी

CoronaVirus News : मोठा निर्णय! 'या' राज्यात मोफत होणार कोरोना चाचणी

Next

भोपाळ - देशात कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. कोरोनामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले असून एकूण रुग्णांची संख्या ही 42 लाखांपर्यंत पोहोचली आहे. देशभरात आतापर्यंत 70 हजारांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. मास्क, सोशल डिस्टंसिंग, क्वारंटाईनच्या माध्यमातून काळजी घेतली जात आहे. कोरोना चाचण्यांचे प्रमाणही वाढवण्यात आले आहे. अशातच एका राज्याने कोरोना चाचणी संदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. 

मोफत कोरोना चाचणीसाठी फिव्हर क्लीनिकची संख्या वाढवणार 

मध्य प्रदेशमध्ये कोरोना चाचणीसाठी नागरिकांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही म्हणजेच कोरोनाची चाचणी मोफत होणार आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या अध्यक्षतेत झालेल्या कॅबिनेट बैठकीत सरकारने हा महत्त्वाचा निर्णय़ घेतला आहे. संपूर्ण प्रदेशात मोफत कोरोना चाचणी करण्यासाठी फिव्हर क्लीनिकची संख्या वाढविण्यात येणार आहे. तसेच ऑक्सिजन बेड्सची संख्या वाढवून 3700 पर्यंत करण्यात येईल. यानंतर ऑक्सिजन बेड्सची संख्या 11700 पर्यंत होणार आहे. 

कोरोना संदर्भात जागरुकता अभियान चालविण्याचा निर्णय

सरकारने 700 आयसीयू बेड्स वाढविण्याचा देखील निर्णय घेतला आहे. शिवराज सरकारच्या निर्णयानुसार, राज्यात कोरोना व्हायरसवर नियंत्रण आणण्यासाठी रुग्णालयात बेड्स वाढविण्यात येत आहे. याअंतर्गत ग्वालियर आणि जबलपूरमध्ये बेड्सची संख्या सर्वात जास्त वाढविण्यात येईल. तसेच कॅबिनेटच्या बैठकीत सरकारने कोरोना संदर्भात जागरुकता अभियान चालविण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत नगर आणि पंचायत विभाग, शहर, आणि गावात प्रचार अभियान सुरू करण्यात येईल. 

सरकारने दावा केला आहे की सध्या 30,000 जनरल बेड्स आहेत.  याची संख्या वाढविल्याने रुग्णांवर उपचार करणे सोपे जाईल. शिवराज सिंह चौहान यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यावर त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र त्यानंतर त्यांनी आता कोरोनाची लढाई जिंकली असून व्हायरसवर यशस्वीरित्या मात केली आहे. यानंतर त्यांनी प्लाझ्मादान करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या या संकटात इतरांचा जीव वाचवता यावा म्हणून प्लाझ्मादान  करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. 

कोरोना रुग्णांसाठी प्लाझ्मा थेरपी फायदेशीर 

कोरोना रुग्णांसाठी देशात प्लाझ्मा थेरपी ही फायदेशीर ठरत आहे. त्यामुळे लोकांचा जीव वाचवण्यासाठी प्लाझ्मादान करण्याचा निर्णय घेतला. राज्यातील कोरोनाचा मृत्यूदर कमी करण्यासाठी प्रशासन, डॉक्टर आणि जनतेने मिळून काम करणं गरजेचं असल्याचं शिवराज यांनी म्हटलं होतं. लवकरात लवकर कोरोनाग्रस्तांची माहिती मिळावी आणि आरोग्य विषयक सुविधा तातडीने लोकांना उपलब्ध व्हाव्यात यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं देखील मुख्यमंत्र्यांनी म्हटलं होतं. 

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : हे कसले आई-बाप?, नवजात बाळाला कोरोनाची लागण; रुग्णालयात सोडून जन्मदात्यांनी काढला पळ

कडक सॅल्यूट! 'मजुरांच्या मुलांवर मजुरीची वेळ येऊ नये म्हणून...', शिक्षणासाठी पोलिसाचा पुढाकार

"मुंबईविरोधात बोलणाऱ्यांना Y दर्जाची सुरक्षा", रोहित पवारांनी उपस्थित केली 'ही' शंका 

"मोदी सरकारचा आणखी एक लज्जास्पद प्रयत्न", राहुल गांधींचं पंतप्रधानांवर टीकास्त्र

CoronaVirus News : आशेचा 'किरण'! मानसिक आरोग्य समुपदेशनासाठी मोदी सरकारकडून हेल्पलाईन सुरू

Web Title: CoronaVirus Marathi News shivraj singh chouhan government corona test free madhya pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.