नवी दिल्ली - देशात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वोतोपरी उपाय केले जात असतानाच कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसागणिक वाढत असून नवा उच्चांक गाठत आहे. कोरोनाच्या आकडेवारीने आतापर्यंतचा 24 तासांतील नव्या रुग्णांच्या संख्येचा रेकॉर्ड मोडला आहे. रुग्णांची संख्या ही तब्बल 44 लाखांवर पोहोचली असून पुन्हा एकदा हादरवणारी आकडेवारी समोर आली आहे.
भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या 44,65,864 वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात 75062 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. गुरुवारी (10 सप्टेंबर) देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 95,735 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 44 लाख 65 हजारांवर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 75 हजारांवर पोहोचला आहे.
देशात कोरोनाचा धोका वाढत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 919018 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 3471784 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. कोरोना रुग्णांवर प्लाझ्मा थेरपीचा सकारात्मक परिणाम दिसून आला . तसेच यामुळे कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूचा दर कमी झाला असल्याचं देखील म्हटलं होतं. मात्र आता प्लाझ्मा थेरपीबाबत महत्त्वाची माहिती मिळत आहे. इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) प्लाझ्मा थेरपी कोरोना रुग्णाचा मृत्यू रोखू शकत नसल्याचं म्हटलं आहे. रिसर्चमधून अशी माहिती समोर आली आहे.
"प्लाझ्मा थेरपी कोरोना रुग्णाचा मृत्यू रोखू शकत नाही", रिसर्चमधून खुलासा
14 राज्यांच्या 39 रुग्णालयातील 464 रुग्णांवर प्लाझ्मा थेरपीचा वापर करण्यात आल्यानंतर आयसीएमआरच्या संशोधकांनी असं म्हटलं आहे. रिसर्चमध्ये याबाबत खुलासा करण्यात आला आहे. एखाद्या कोरोना रुग्णाची प्रकृती गंभीर होत असेल तर त्याची प्रकृती बिघडण्यापासून रोखण्यातही प्लाझ्मा थेरपीचा वापर प्रभावी ठरत नसल्याचं रिसर्चमध्ये स्पष्ट केलं आहे. संशोधनानुसार प्लाझ्मा थेरपीचा थोडा वापर नक्कीच दिसून आला. श्वासोच्छवास घेताना समस्या किंवा थकवा कमी करण्यासाठी प्लाझ्मा थेरपीचा वापर झाला. ताप किंवा खोकला यासारख्या लक्षणांवर मात्र प्लाझ्मा थेरपीचा वापर होऊ शकला नसल्याचं संशोधनातून समोर आलं आहे.
चीनने कशी केली कोरोनावर मात?, WHO ने जगाला सांगितलं सत्य
कोरोनावर मात करण्यात चीनला यश आले आहे. चीनने बऱ्यापैकी कोरोनावर नियंत्रण मिळवलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेने चीनने करोनाच्या संसर्गावर मात करण्यासाठी केलेल्या उपायाबाबतचं सत्य आता जगासमोर आणलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे वरिष्ठ सल्लागार ब्रूस आयलवर्ड पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, चीनमध्ये गेल्या 20 दिवसांपासून कोरोनाचा एकही नवा रुग्ण आढळलेला नाही ही अतिशय महत्त्वाची बाब आहे. कोविड-19 महासाथी दरम्यान त्यांनी आंतरराष्ट्रीय तज्ञांच्या पथकासोबत चीनचा दौरा केला होता. तीन महत्त्वाच्या गोष्टींमुळे चीनला करोनाविरोधात मोठे यश मिळाले असल्याचे त्यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
भारीच! मोदींच्या 'आत्मनिर्भर भारत अभियाना'मुळे बदललं तरुणाचं नशीब, महिन्याला लाखोंची कमाई
"निवडणुकीच्या फायद्यासाठी स्टार सुशांतसिंहला भाजपाने केलं 'बिहारी अभिनेता", काँग्रेसचं टीकास्त्र
CoronaVirus News : चीनने कशी केली कोरोनावर मात?, WHO ने जगाला सांगितलं सत्य
CoronaVirus News : "प्लाझ्मा थेरपी कोरोना रुग्णाचा मृत्यू रोखू शकत नाही", रिसर्चमधून खुलासा
"21 दिवसांत कोरोना संपवण्याचं वचन होतं पण कोट्यवधी रोजगार, छोटे उद्योग संपवण्यात आले"