नवी दिल्ली - जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या आणि मृतांचा आकडा हा दिवसागणिक वाढत आहे. जगातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची संख्या एक कोटीच्या वर पोहोचली आहे. तर दुसरीकडे लाखो लोकांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी तंत्रज्ञानाचा देखील मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. याच दरम्यान एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
देशात कोरोनापासून बचाव करणारा एक खास सॅनिटायझर पेन (Sanitizer Pen) आला आहे. त्यामुळे आता लिहिता लिहिता हात देखील स्वच्छ होणार आहे. कोरोनाच्या संकटात सॅनिटायझरची गरज लक्षात घेता लखनौमध्ये सॅनिटायझर पेन तयार करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. साधारण तीन तास या सॅनिटायझर पेनमुळे संरक्षण करता येईल असा दावा पेन तयार करणाऱ्या कंपनीने केला आहे. त्यामुळे सध्या या पेनची जोरदार चर्चा रंगली आहे.
मेडिशिल्ड हेल्थकेअरचे डॉ. फराज हसन यांनी दिलेल्या माहितीनुसार, "सॅनिटायझरचा फारसा वापर हा याआधी होत नव्हता. मात्र आता ही अत्यावश्यक वस्तू झाली आहे. प्रत्येकाच्या गरजाही वेगळ्या आहेत. एक व्यावसायिक म्हणून आम्हाला त्यांची काळजी आहे. त्यामुळे आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे सॅनिटायझर ठेवतो. तसाच हा एक सॅनिटायझर पेन आहे. खास असलेला सॅनिटायझर पेन विद्यार्थी आणि ऑफिसला जाणाऱ्या व्यक्तींसाठी अत्यंत उपयोगाचा आहे" असं हसन यांनी म्हटलं आहे.
लिहिताना या पेनमुळे हातही सॅनिटाईझ करू शकता. यामुळे तीन तासांपर्यंत संरक्षण मिळू शकतं असा दावा हसन यांनी केला आहे. तसे कंपनीमार्फत वेगवेगळ्या प्रकारचे सॅनिटायझरचं उत्पादन केलं जात असल्याचं देखील म्हटलं आहे. 50 मिलीपासून 5 लीटरपर्यंत सॅनिटायझर उपलब्ध आहे. यामुळे पैशाच्या नोटा, चावी यांच्यासारख्या अनेक वस्तू वेगळ्या सॅनिटायझरने स्वच्छ करता येऊ शकतात अशी माहिती दिली आहे. एका इंग्रजी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : शुभमंगल साssवधान! लग्न पडलं महागात, 80 जण कोरोना पॉझिटिव्ह, अनेकांचा जीव धोक्यात
बापरे! भरधाव ट्रेनसमोर जीवघेणा खेळ अन्...; अंगावर काटा आणणारा Video जोरदार व्हायरल
CoronaVirus News : कोरोनाचा हाहाकार! 'या' देशात घराघरात, रस्त्यावर आढळताहेत मृतदेह, परिस्थिती गंभीर
"हल्ली विरोधी पक्षनेतेपदाचे दिवस धूमधडक्यात साजरे होताहेत", मुख्यमंत्र्यांचा फडणवीसांना चिमटा