नवी दिल्ली - भारतातील कोरोना रुग्णांची संख्या ही सातत्याने वाढत आहे. कोरोनामुळे देशातील परिस्थिती गंभीर झाली आहे. देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ झाली असून धडकी भरवणारी आकडेवारी समोर आली आहे. रुग्णसंख्येने पुन्हा एकदा रेकॉर्ड मोडला आहे. देशातील रुग्णसंख्येने आतापर्यंतचा उच्चांक गाठला आहे. गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल 64,531 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 1092 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या 27,67,274 वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात 52,889 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. बुधवारी (19 ऑगस्ट) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत 64,531 नवीन कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 27 लाख 67 हजारांवर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 52 हजारांवर पोहोचला आहे.
देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 6,76,514 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 20,37,871 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. कोरोनाच्या संकटाचा सामना करत असतानाच चिंता वाढवणारी माहिती समोर आली आहे. कोरोनावर मात केलेल्या रुग्णांमध्ये पुन्हा एकदा लक्षणं दिसत असल्याची माहिती समोर आली आहे. कोरोनातून बऱ्या झालेल्या अनेक रुग्णांना आरोग्यासंबंधित अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. दिल्ली सरकारच्या राजीव गांधी सुपर स्पेशालिटी रुग्णालयामध्ये कोविड-19 क्लिनिक सुरू होत आहे. यामध्ये कोरोनामुक्त रुग्णांमध्ये पुन्हा लक्षणं आढळल्यास त्याचं विश्लेषण केलं जाणार आहे.
रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. बी.एल. शेरवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला असला तरी याचा अर्थ अनेकांना पुन्हा त्रास जाणवू लागला आहे. कोरोनातून लोक बरे होत आहेत. मात्र त्यानंतर देखील आता रुग्णांना श्वासोच्छवासाच्या तक्रारी आल्या आहेत. आम्हाला यासंदर्भात रूग्णांकडून बरेच फोनही आले आहेत. म्हणूनच पोस्ट कोविड-19 क्लिनिक सुरू करण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
"...तर पंजाब पेटून उठेल", मुख्यमंत्र्यांचा केंद्र सरकारला गंभीर इशारा
CoronaVirus News : तंत्रज्ञानाची कमाल! आता चेहऱ्यावर मशीन लावणार मास्क, Video तुफान व्हायरल
"काँग्रेसने 70 वर्षांत काय केलं?, असा प्रश्न विचारत शहा एम्समध्ये उपचारासाठी दाखल"
CoronaVirus News : कोरोनाचा धसका! वडिलांचे अंत्यसंस्कार करण्यास मुलाने दिला नकार, शेवटी...