नवी दिल्ली - संपूर्ण जग सध्या कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहेत. अनेक देशांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून जगभरातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल दोन कोटींचा टप्पा पार केला आहे. तर सात लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर दुसरीकडे देशातही कोरोनाचा धोका वाढत आहे. रुग्णांची संख्या सातत्याने नवा उच्चांक गाठत असून धडकी भरवणारी आकडेवारी समोर येत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा 24,61,191 वर गेला आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी (14 ऑगस्ट) दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 64,553 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 1007 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 24 लाख 61 हजारांवर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 48 हजारांवर पोहोचला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 6,61,595 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 17,51,556 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
देशात कोरोनाचा धोका वाढला असून गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ झाली आहे. तसेच चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. देशातील रुग्णसंख्येने आतापर्यंतचा उच्चांक गाठला आहे. जगभरात भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या कोरोनामुळे आतापर्यत सात लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाच्या संकटात अनेकांनी व्हायरसवर मात करून ही लढाई जिंकली आहे. तब्बल 13,706,678 लोक बरे झाल्याची माहिती मिळत आहे. मात्र याच दरम्यान रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल दोन कोटींचा टप्पा पार केला असून आतापर्यंत 20,806,983 लोकांना त्याचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
"मी काय केलं होतं?, माझ्या घरावर का हल्ला केला?, माझं घर का पेटवलंत?"
Video - कडक सॅल्यूट! पीपीई किट काढताना अशी होते कोरोना योद्ध्यांची अवस्था, वाहतात घामाच्या धारा
CoronaVirus News : काय सांगता? कोरोनाचं मूळ शोधण्यासाठी संशोधक पोहोचले वटवाघुळाच्या गुहेत
15 ऑगस्ट! पंतप्रधान मोदींनी देशवासियांकडून मागितली 'ही' गोष्ट, म्हणाले...
'"पाडून दाखवा सरकारचे" हे मंत्री आहेत की भांडखोर सासूबाई?', आशिष शेलारांचा हल्लाबोल
"आजोबा आपल्या नातवाची लायकी जाहीररीत्या काढू शकतात हे पहिल्यांदाच पाहिलं"