नवी दिल्ली - देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून रुग्णांचा आकडा 14 लाखांवर पोहोचला आहे. कोरोनाच्या धक्कादायक आकडेवारीने चिंता वाढवली आहे. देशातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 14,35,453 वर गेली आहे तर आतापर्यंत देशभरात तब्बल 32,771 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 49,931 नवे रुग्ण आढळून आले असून 708 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना संदर्भात विविध ठिकाणी संशोधन करण्यात येत आहे.
संशोधनातून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. अमेरिकेतील स्टॅनफर्ड विद्यापीठातील संशोधकांनी देशातील कोरोना परिस्थितीचा अभ्यास केला आहे. यामध्ये कर्नाटक सरकारने सर्वात चांगलं काम केलं असल्याने त्यांचं भरभरून कौतुक केलं आहे. कोरोनासंदर्भातील आकडेवारीची नोंद योग्य प्रकारे ठेवल्याचं संशोधकांनी म्हटलं आहे. तर बिहार आणि उत्तर प्रदेश सारख्या राज्यांनी या संदर्भात सर्वात वाईट कामगिरी केल्याचेही या अभ्यासामध्ये नमूद करण्यात आलं.
भारतामधील कोरोनासंदर्भातील आकडेवारीचा अहवाल हा MedRxiv मध्ये देण्यात आला आहे. यामध्ये कोरोनाचा डेटा कोणत्या राज्याने संकलित केला त्याची माहिती दिली आहे. "आम्ही भारतातील राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांकडून नोंद करण्यात आलेल्या कोरोनासंदर्भातील आकडेवारीचा तुलनात्मक सखोल अभ्यास केला असून त्याचा अहवाल सादर करत आहोत" असं अमेरिकेतील स्टॅनफर्ड विद्यापीठातील संशोधकांनी म्हटलं आहे.देशातील राज्यांनी तसेच केंद्रशासित प्रदेशांनी कोरोनासंदर्भातील आकडेवारीची गुणवत्ता तपासण्यासाठी एक सेमी क्वांटीटेटीव्ह पद्धतीचा वापर केला.
भारतामधील विविध राज्यांमधील कोरोनासंदर्भातील आकडेवारीचा चार प्रमुख मुद्द्यांवर अभ्यास करण्यात आला. ज्यात उपलब्धता, माहिती लोकांपर्यंत पोहचण्याचे प्रमाण, माहितीमधील सर्व तपशील आणि गोपनियता या प्रमुख मुद्द्यांचा समावेश होता. या सर्व मुद्द्यांचा अभ्यास करुन अभ्यासकांनी ‘कोविड 19 डेटा रिपोर्टिंगमध्ये स्कोअर (सीडीआरएस 0 ते 1 दरम्यानचे रेटींग )’ काढला. 19 मे ते 1 जूनमध्ये संशोधकांनी माहितीचा सखोल अभ्यास केला आहे.
"आमच्या अभ्यासामध्ये भारतातील वेगवेगळ्या राज्यांनी सादर केलेल्या आकडेवारीमधील गुवणत्तेमध्ये मोठी तफावत असल्याचे सांगत आहेत. कर्नाटकचा सीडीआरएस हा 0.61 इतका आहे. तर उत्तर प्रदेश आणि बिहारचा सीडीआरएस शून्य आहे. तर संपूर्ण देशाचा सरासरी सीडीआरएस 0.26 इतका आहे. पंजाब आणि चंढीगडमधील अनेक वेबसाईट क्वारंटाईन केलेल्या रुग्णांची माहिती सार्वजनिक करुन त्यांचा गोपनियतेच्या हक्काचा भंग करत असल्याचेही अहवालामध्ये म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : शुभमंगल साssवधान! लग्न पडलं महागात, 80 जण कोरोना पॉझिटिव्ह, अनेकांचा जीव धोक्यात
बापरे! भरधाव ट्रेनसमोर जीवघेणा खेळ अन्...; अंगावर काटा आणणारा Video जोरदार व्हायरल
CoronaVirus News : कोरोनाचा हाहाकार! 'या' देशात घराघरात, रस्त्यावर आढळताहेत मृतदेह, परिस्थिती गंभीर
"हल्ली विरोधी पक्षनेतेपदाचे दिवस धूमधडक्यात साजरे होताहेत", मुख्यमंत्र्यांचा फडणवीसांना चिमटा