नवी दिल्ली - देशात कोरोनाचा धोका वाढला असून एकूण रुग्णसंख्येने 12 लाखांचा टप्पा पार केला आहे. देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 45,720 नवे रुग्ण आढळले असून 1,129 जणांचा मृत्यू झाला आहे. तर कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 29,861 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याच दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे. परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळत आहे. यामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे मार्च महिन्यापासून देशभरातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शाळा-महाविद्यालयं बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र केरळमध्ये इंजिनिअरिंग आर्किटेक्चर मेडिकल (केईएएम) प्रवेश परीक्षा झाल्या. 16 जुलै रोजी या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. या परीक्षेला बसलेले काही विद्यार्थी हे कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती आता समोर आली आहे.
केरळमध्ये या परीक्षेदरम्यान परीक्षा केंद्रावरही मोठा गोंधळ झाला होता. आपल्या मुलांना सोडण्यासाठी पालकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. यामुळे सोशल डिस्टंसिंगच्या नियमचा देखील फज्जा उडाला. त्यामुळेच जवळपास 600 पालकांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. हजारो विद्यर्थ्यांनी ही परीक्षा दिली. त्यातील अनेक विद्यार्थी हे कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे आता एकच खळबळ उडाली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
कर्नाटकमध्ये ही याआधी अशीच एक धक्कादायक घटना घडली होती. कर्नाटक बोर्डाने काही दिवसांपूर्वी SSLC च्या परीक्षा घेतल्या. ही परीक्षा दिलेल्या तब्बल 32 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली. विद्यार्थ्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली. कर्नाटकामध्ये जवळपास आठ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. 25 जूनपासून ही परीक्षा सुरू झाली होती. मात्र परीक्षा देऊन आलेल्या 32 विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
महत्त्वाच्या बातम्या
गलवान खोऱ्यात शहीद झालेल्या कर्नल संतोष बाबू यांच्या पत्नी झाल्या उपजिल्हाधिकारी
CoronaVirus News : भयंकर! कोरोनाग्रस्ताच्या मृत्यूनंतर कुटुंबाने पेटवून दिली रुग्णवाहिका
CoronaVirus News : कोरोना वॅक्सीन नेमकी कधी उपलब्ध होणार?, WHO ने दिली महत्त्वाची माहिती
प्रियंका गांधी लवकरच सरकारी बंगला सोडणार, 'या' ठिकाणी राहायला जाणार
"वचन होतं राम राज्याचं, दिलं गुंडाराज"; राहुल गांधींचा सरकारवर हल्लाबोल
कौतुकास्पद! कोरोनावर मात केल्यानंतर चक्क उद्योगपतीने ऑफिसला बनवलं रुग्णालय, मोफत देतोय उपचार