नवी दिल्ली - देशात कोरोनाने थैमान घातले असून गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही तब्बल 17 लाखांवर गेली आहे. तर आतापर्यंत अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या सातत्याने वाढत असतानाच तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
बनवारीलाल पुरोहित यांच्यात कोरोनाची काही लक्षणे दिसू लागल्याने त्यांची चाचणी करण्यात आली होती. चाचणी पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्यावर आता त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. कावेरी हॉस्पिटलने याबाबत मेडिकल बुलेटीन जारी केलं आहे. पुरोहित यांना फारशी लक्षणे दिसत नाहीत. त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांना घरीच क्वारंटाईन करण्यात आलं असून त्यांच्यावर डॉक्टरांचं पथक लक्ष ठेवून असल्याचंही हॉस्पिटलने म्हटलं आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याची माहिती मिळत आहे. अमित शहा यांनी स्वतः ट्विट करून याबाबत माहिती दिली. कोरोनाची काही प्राथमिक लक्षणं दिसल्यानंतर शहांनी टेस्ट केली होती, त्या टेस्टचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.
"रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून माझी तब्येत ठीक आहे. डॉक्टर्सच्या सल्ल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मागील काही काळात माझ्या संपर्कात आलेल्या लोकांनी तात्काळ स्वत:ला आयसोलेट करुन कोरोना टेस्ट करावी" असं आवाहन अमित शहा यांनी केलं आहे. काही दिवसांपूर्वी बिग बी अमिताभ बच्चन यांना देखील कोरोनाची लागण झाली होती. अभिषेक, ऐश्वर्या, आराध्या बच्चनही पॉझिटिव्ह आढळून आले होते. तसेच मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कोरोना पॉझिटिव्ह
टिक टाॅकची 'टिकटिक' किती देशांत?; जाणून घ्या चायनीज अॅपबद्दल बरंच काही...
Video - ...म्हणून गर्भवतीला टोपलीत बसवून नदी पार करत पोहचवलं रुग्णालयात
"राम मंदिरासाठी पंतप्रधान मोदींचं कोणतंही योगदान नाही तर..." भाजपा खासदाराचा घरचा आहेर
धक्कादायक! पंजाबमध्ये विषारी दारूने घेतला 86 जणांचा बळी; 25 जणांना अटक
मोदी सरकारचा चीनला आणखी एक दणका; कलर TV आयात करण्यास बंदी