नवी दिल्ली : भारतात करोना व्हायरसचा कहर वाढतच चालला आहे. देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे तब्बल 6387 नवे रुग्ण आढळून आले. यानंतर आता देशातील एकूण कोरोना बाधितांचा आकडा दीड लाख वर पोहोचला आहे. धक्कादायक बाब म्हणजे केवळ 10 दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या 1 लाखवरून दीड लाखवर गेली आहे. कोरोना रुग्णांची झपाट्याने वाढत चाललेली ही संख्या देशाच्या दृष्टीने चिंतेचा विषय आहे.
केवळ मे महिन्यातच समोर आले एक लाखहून अधिक रुग्ण :भारतात कोरोनाचा पहिला रुग्ण 30 जानेवारीला आढळून आला होता. यानंतर फेब्रुवारीपर्यंत याचा वेग कमी होता. 30 एप्रिलपर्यंत एकूण कोरोनाबाधितांची संख्या 34,866 एवढी होती. यानंतर मे महिन्यात कोरोनाबाधितांचा आकडा दीड लाखच्याही पुढे गेला आहे. अर्थात गेल्या केवळ 27 दिवसांतच तब्बल 1,16,901 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.
जाणून घ्या; पॉझिटिव्ह रुग्णांपासून 'किती ते किती दिवसांपर्यंत' पसरतो कोरोना? संशोधनाचा मोठा दावा
देशात 06 मे 2020 रोजी कोरोनाबाधितांची संख्या 53,007 एवढी होती. हा आकडा जवळपास तीन महिन्यांच्या कालावधीतील आहे. यानंतरचे जवळपास 50 हजार रुग्ण केवळ 12 दिवसांत वाढले आहेत. अर्था 18 मे 2020 रोजी देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 1,00,326 वर पोहोचला होता. मात्र, यानंतर चे 50 हजार नवे कोरोनाबाधित केवळ 10 दिवसांत समोर आले आहेत. आज 27 मे 2020च्या सकाळपर्यंत देशातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 1,51,767 वर पोहोचला आहे.
यामुळे फेल होऊ शकते कोरोना व्हॅक्सीन? वैज्ञानिक म्हणतात...
24 तासांत 170 जणांचा मृत्यू -गेल्या 24 तासांत 6,387 नवे कोरोनाबाधित समोर आले असून 170 जणांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत 64 हजार 425 जण कोरोनापासून मुक्त झाले आहेत. तर 83 हजार हून अधिक अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. देशात आतापर्यंत 4,337 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. यातील सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात झाले आहेत. येथे आतापर्यंत 1,792 जणांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे.
POK : पाकिस्तानने चीनच्या सोबतीने उचलले मोठे पाऊल; भारताची डोकेदुखी वाढण्याची शक्यता
टॉप 10 देशांमध्ये भारत - भारतातील कोरोननाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. आता भारत कोरोना संक्रमित टॉप 10 देशांच्या यादीत सामील झाला आहे. भारताच्या पुढे आता अमेरिका (1,725,275), ब्राझील (394,507), रशिया (362,342), स्पेन (283,339), इंग्लंड (265,227), इटली (230,555), फ्रान्स (182,722), जर्मनी (181,288) आणि तुर्की (158,762) यांचा क्रमांक लागतो.