नवी दिल्ली : देशात कोरोना व्हायरस वेगाने पसरत चालला आहे. रोज समोर येणारे विक्रमी केरोना बाधित असोत अथवा कोरोनाबाधितांच्या मृत्यूची संख्या, हे संपूर्ण चीत्र भयभीत करणारे आहे. सुरुवातीच्या अडीच महिन्यांच्या काळात देशात एकूण जेवढे कोरोना रुग्ण होते, एवढे आता एकाच दिवसात समोर येऊ लागले आहेत.
केवळ 5 दिवसांत 50 हजारहून अधिक कोरोनाबाधित -एकिकडे मॉल्सपासून ते धार्मिक स्थळांपर्यंत अणेक सार्वजनिक ठिकाणे सोमवारपासून खुली होते आहेत. तर दुसरीकडे कोरोना व्हायरस घातक रूप धारण करू लागला आहे. राज्य सरकारांच्या आकडेवारीनुसार, आता देशतील कोरोनाबाधितांच्या संख्येने अडीच लाखांचा आकडाही ओलांडला आहे. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 2,57,334 वर पोहोचली आहे. केवळ 5 दिवसांत जवळपास 50 हजारहून अधिक कोरोनाबाधित समोर आले आहेत. 2 जूनलाला देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 2 लाखवर पोहोचली होती. हीच संख्या 7 जूनला अडीच लाखांच्याही पुढे गेली आहे.
सुरुवातीच्या अडीच महिन्या एवढे कोरोनाबाधित एकाच दिवसात! -देशात रविवारी कोरोनाबाधितांच्या संख्येत विक्रमी वाढ झाली. एकाच दिवसात 10,700हून अधिक नवे कोरोनाबाधित समोर आले. सलग दुसऱ्या दिवशी देशात 10 हजारहून अधिक नवे कोरोनाबाधित समोर आले आहेत. शनिवारी 10,434 नवे रुग्ण समोर आले होते. देशात कोरोना आल्यानंतर पुढच्या अडीच महिन्यांत जेवढे रुग्ण आढळले, तेवढे रुग्ण आता एकाच दिवसात सापडू लागले आहेत. देशातील कोरोना संक्रमणाच्या वेगाचा संकटाचा अंदाज या एकाच गोष्टीवरू लावता येऊ शकतो.
CoronaVirus News: आश्चर्य! कोरोना व्हायरस अँटीबॉडीजसह बाळाचा जन्म, डॉक्टर हैराण; रुग्णालय म्हणते...
देशात 30 जानेवारीला पहिला कोरोना संक्रमित व्यक्ती सापडला होता. त्यानंतर 74 दिवसांनी म्हणजेच 13 एप्रिलला एकूण कोरोनाबाधितांच्या संख्येने 10 हजारचा आकडा ओलांडला होता.
आता या 'स्वस्त' औषधाने होणार कोरोनाचा 'मस्त' इलाज? गोळीची किंमत फक्त 1 रुपया
सलग पाचव्या दिवशी 250 हून अधिक लोकांचा मृत्यू -देशातील कोरोनाबाधिताच्या मृत्यूचा आकडा 7 हजारच्या पुढे गेला आहे. आतातर गेल्या पाच दिवसांपासून कोरोनामुळे मरणाऱ्यांची संख्या 250 हून अधिक आहे. रविवार तर कोरोनामुळे 262 जणांचा मृत्यू झाला. मात्र, शुक्रवार आणि शनिवारच्या तुलनेत ही संख्या कमी होती. शनिवारी 297 तर शुक्रवारी 295 लोकांचा मृत्यू झाला होता. देशात कोरोनामुळे आतापर्यंत 7,201 जणांचा मृत्यू झाला आहे.
कोरोनाचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला आहे. महाराष्ट्रात चीनपेक्षाही अधिक रुग्ण सापडले आहेत. राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता 85 वर पोहोचली आहे. तर चीनमध्ये आतापर्यंत 83,040 कोरोनाबाधित आढळून आले आहेत. रविवारी महाराष्ट्रात तब्बल 3,007 नवे कोरोनाबाधित समोर आले होते.