वॉशिंग्टन - जगभरातील अनेक देश कोरोनावरील व्हॅक्सीन तयार करण्याच्या कामात व्यस्त आहेत. महासत्ता अमेरिकाही कंबर कसून व्हॅक्सीन तयार करण्याच्या कामात लागली आहे. आता, कोरोना व्हायरसवरील व्हॅक्सीन तयार करण्यात अमेरिकेला मोठे यश आले आहे. यासंदर्भात खुद्द अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करून माहिती दिली आहे. मंगळवारी राष्ट्रपती ट्रम्प यांनी, 'व्हॅक्सीन आणि थेराप्यूटिकवर जबरदस्त प्रगती होत आहे,' असे ट्विट केले आहे.
यापूर्वीही अमेरिकेचे डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करत, 'वॅक्सीनवर चांगली बातमी आहे,' असे म्हटले होते. अमेरिकेत सर्वप्रथम टेस्ट केल्या गेलेल्या तसेच मॉडर्ना इंकने तयार केलेल्या व्हॅक्सीनच्या पहिल्या आणि दुसऱ्या चाचणीच्या निकालामुळे वैज्ञानिक आनंदात आहेत. मात्र, आता ट्रम्प यांनी केलेल्या ट्विट नंतर, व्हॅक्सीनसंदर्भात सुरू असलेल्या संशोधनात मोठ्या प्रमाणावर यश मिळाले असल्याचे मानते जात आहे. सध्या जगभरात कोरोना व्हॅक्सीनच्या चाचण्या सुरू आहेत.
भारतातही कोरोना व्हायरसवरील व्हॅक्सीनचे मानवी परीक्षण सुरू झाले आहे. COVAXIN असे या स्वदेशी व्हॅक्सीनचे नाव आहे. नुकतेच केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी एक ट्विट करत, 'स्वदेशी कोरोना व्हॅक्सीनचे ह्यूमन ट्रायल सुरू झाले आहे. कोरोना व्हायरस विरोधातील लढाई आता निर्णायक टप्प्यावर आहे. गेल्या काही महिन्यांपासून कोरोना व्हायरसच्या विकासासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांनंतर सकारात्मक संकेत मिळत आहेत. आपण लवकरच या महामारीवर विजय मिळवू,' असे म्हटले होते.
चीनच्या वुहान शहरातून पसरलेल्या कोरोना व्हायरसने भारत आणि अमेरिकेसह संपूर्ण जगाला आपल्या विळख्यात घेतले आहे. याचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला आहे. अमेरिकत आतापर्यंत तब्बल 38 लाख 31 हजार 400 हून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी तब्बल 1 लाख 40 हजार 900 हून अधिक लोकांचा कोरोनाने बळी घेतला आहे.
तसेच कोरोननाबाधितांच्या संख्येच्या बाबतीत भारत आता तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारतातील कोरोना रुग्णांची संख्या आता 11 लाख 55 हजार 190 हून अधिक झाली आहे. यांपैकी 28 हजार 84 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 7 लाख 24 हजार 577 हून अधिक लोकांनी कोरोनावर मात केली आहे. त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या -
'या' वर्षी कोरोना लस येणार का?; खुद्द ऑक्सफर्डच्या डेव्हलपर्सनी दिले मोठे 'अपडेट'
100 कोटींचे बजेट, 3 मजले अन् तब्बल 318 खांब... असे असेल अयोध्येतील भव्य राम मंदिर
CoronaVirus : मानवी चाचणीच्या टप्प्यात पोहोचल्या आहेत 'या' लसी; जाणून घ्या, केव्हापर्यंत होणार तयार?
आई शप्पथ!...रशियातील काही उद्योगपती, नेत्यांनी एप्रिलमध्येच घेतली कोरोनावरील लस
बुरखा फाटला!, सरकार PLA सोबत संबंध असणाऱ्या कंपन्यांविरोधात अॅक्शन घेण्याच्या तयारीत
...तर पाकिस्तानातच पकडले गेले असले अजित डोवाल!; तुम्हाला माहीत आहेत का त्यांचे 'हे' भीमप्रताप