लखनौ - उत्तर प्रदेश सरकारने कोरोना व्हायरसचा सामना करण्यसाठी आता नव्या प्लॅनवर काम करायला सुरुवात केली आहे. या प्लॅननुसार उत्तर प्रदेशात विकेंड लॉकडाउन फॉर्म्युला लागू करण्यात येणार आहे. यामुळे कोरोना संक्रमण रोखण्यासाठी उत्तर प्रदेशात आता दर आठवड्याला विकेंड लॉकडाउन असेल.
उत्तर प्रदेशात दर आठवड्याला शनिवारी आणि रविवारी लॉकडाउन असेल. यात सर्व बाजार आणि कार्यालये बंद राहतील. याचाच अर्थ राज्यातील सर्व बाजार आणि कार्यालये आठवड्यातील केवळ पाच दिवसच खुली राहतील. कोरोना संकटावर मात करण्यासाठी हा नवा प्लॅन लागू करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. लवकरच याची आधिकृत घोषणा करण्यात येईल, असे मानले जात आहे.
मुख्य सचिव राजेंद्र तिवारी यांनी शुक्रवारी रात्री 10 वाजल्यापासून सोमवारी सकाळी 5 वाजेपर्यंत लॉकडाउनचा आदेश जारी केला होता. तेव्हापासूनच या नव्या प्लॅनचा अंदाज लावला जात होता. वीकेंडला लॉकडाउन करण्याचा हा प्लॅन बरेच दिवस चालेल. मुख्यमंत्रीयोगी आदित्यनाथ यांनीही ट्विटरवरूल यासंदर्भात संकेत दिले होते.
सांगण्यात येते, की विकेंड लॉकडाउनचा हा निर्णय मुख्यमंत्रीयोगी आदित्यनाथ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या टीम 11च्या बैठकीतच घेण्यात आला होता. कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत चालल्याने ट्रांसमिशन साखळी तोडण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.
उत्तर प्रदेश सरकारने हा निर्णय घेण्यापूर्वीच कर्नाटक सरकारने विकेंड लॉकडाउनचा निर्णय घेतला आहे. एवढेच नाही, तर कर्नाटक सरकारने याची घोषणाही केली आहे. कर्नाटकात 2 ऑगस्टपर्यंत दर शनिवार आणि रविवारी सर्व बाजार आणि कार्यालये बंद असणार आहेत.
महाराष्ट्रात कोरोना अधिक घातक -कोरोनामुळे महाराष्ट्रात शनिवारी 223 जणांचा मृत्यू झाला. याच बरोबर महाराष्ट्रातील मृतांच्या आकड्याने 10 हजारचा टप्पाही ओलांडला आहे. देशात कोरोनामुळे आतापर्यंत 22,123 जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी 45 टक्के मृत्यू केवळ महाराष्ट्रात झाले आहेत.
देशभरात एकाच दिवसात २७,११४ नवे रुग्णदेशभरात शनिवारी एकाच दिवसात कोरोनाचे २७ हजार १४४ नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे कोरोना रुग्णांची एकूण संख्या ८ लाख २० हजार ९१६ इतकी झाली आहे. या संसर्गाने आणखी ५१९ जण मरण पावले असून बळींची संख्या २२ हजार १२३ इतकी झाली आहे, असे केंद्रीय आरोग्य खात्याने सांगितले. देशात अवघ्या तीन दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या सात लाखांवरून आठ लाखांवर गेली आहे.
महत्त्वाच्या बातम्या -
CoronaVirus : मोलकरणीच्या नावानं पाठवलं पत्नीचं Corona सॅम्पल, रिपोर्ट आला पॉजिटिव्ह!; मग...
धक्कादायक! : हनीट्रॅप अन् 9 कोटी 'हेर'; धूर्त चीन अशी करतो जगाची 'हेरगिरी'
खुशखबर...! औषध सापडलं...! एड्सबाधित रुग्ण झाला ठणठणीत; वैज्ञानिकांचा दावा
ड्रॉप होऊ शकते कोरोना व्हॅक्सीनची तिसरी ट्रायल? ICMRच्या वरिष्ठ वैज्ञानिकानं दिलं असं उत्तर