CoronaVirus News : अनोखा आदर्श! लॉकडाऊनमध्ये पार पडला विधवा सुनेचा पुनर्विवाह

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2020 05:34 PM2020-05-06T17:34:42+5:302020-05-06T17:39:35+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाच्या संकटात  लॉकडाऊनमुळे अनेकांचे विवाह लांबणीवर गेले आहेत. याच दरम्यान एका अनोख्या लग्नाची गोष्ट समोर आली आहे.

CoronaVirus Marathi News widow daughter in law marriage lockdown in ratlam SSS | CoronaVirus News : अनोखा आदर्श! लॉकडाऊनमध्ये पार पडला विधवा सुनेचा पुनर्विवाह

CoronaVirus News : अनोखा आदर्श! लॉकडाऊनमध्ये पार पडला विधवा सुनेचा पुनर्विवाह

Next

रतलाम -  देशात कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी देशातील लॉकडाऊन 17 मेपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. भारतात आजपर्यंत 1600 हून अधिक जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर  49,000 हून जास्त रुग्ण सापडले आहेत. कोरोनाच्या संकटात  लॉकडाऊनमुळे अनेकांचे विवाह लांबणीवर गेले आहेत. याच दरम्यान एका अनोख्या लग्नाची गोष्ट समोर आली आहे. लॉकडाऊनमध्ये एका कुटुंबाने आपल्या विधवा सुनेचा पुनर्विवाह व्यवस्थित पार पाडत समाजापुढे अनोखा आदर्श ठेवला आहे.

मध्य प्रदेशच्या रतलाममध्ये सोशल डिस्टंसिंगचं पालन करत काही नातेवाईकांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा पार पडला. लॉकडाऊनमध्ये झालेल्या या लग्नाची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात रंगली आहे. एका वृद्ध दाम्पत्याने आपल्या विधवा सुनेची पाठवणी आपल्या मुलीप्रमाणे केली आहे. रतलामच्या काटजू नगरचे रहिवासी असलेल्या कुटुंबातील मुलगा मोहित जैन याचा विवाह सहा वर्षांपूर्वी आष्टाची रहिवासी असलेल्या सोनम हिच्यासोबत झाला होता. 

लग्नानंतर 3 वर्षांनी मोहितला कर्करोग झाला आणि त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. पतीच्या मृत्यूनंतर सोनमने आपल्या सासू-सासऱ्यांचा सांभाळ मुलीप्रमाणे केला. मात्र तिच्या भविष्याची चिंता असल्याने त्यांनी तिचा पुनर्विवाह करण्याचा निर्णय घेतला आणि एका तरुणाशी लग्न ठरवलं. लॉकडाऊनमुळे काही अडचणींचा सामना करावा लागला. मात्र कुटुंबियांनी प्रशासनाशी चर्चा करत यावर तोडगा काढला. त्यांनी आपल्या घरीच सोनमचा विवाह पार पाडला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : कोरोनाच्या लढाईत कसं काम करतंय मोदी सरकार?; भारतीय म्हणतात...

CoronaVirus News : 'आरोग्य सेतू मित्र' वेबसाईट लाँच; घरबसल्या मिळणार वैद्यकीय सुविधा

CoronaVirus News : महाराष्ट्रातील परिस्थिती गंभीर! केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी व्यक्त केली चिंता; मुख्यमंत्र्यांशी करणार चर्चा

CoronaVirus News : लॉकडाऊनमध्ये अडकलेले तब्बल 80 हजार लोक 70 विशेष ट्रेनने परतले घरी

CoronaVirus News : कोरोनाचा फटका! लॉकडाऊनमुळे कोट्यवधी लोकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड

 

Web Title: CoronaVirus Marathi News widow daughter in law marriage lockdown in ratlam SSS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.