नवी दिल्ली - कोरोनामुळे देशात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. देश कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी सज्ज झाला असून रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. कोरोनाबाबत जगभरात संशोधन करण्यात येत असून नवनवीन माहिती समोर येत आहे. लवकरच फक्त आवाजावरून अवघ्या 30 सेकंदात कोरोना आहे की नाही याबाबत माहिती मिळणार आहे.
रुग्णाच्या केवळ आवाजावरून आणि श्वासोच्छवासाच्या वेगाद्वारे कोरोना व्हायरस आहे किंवा नाही हे ओळखता येणं शक्य आहे का? यावर दिल्लीमध्ये रिसर्च सुरू आहे. इस्रायली संशोधकांच्या एक टीम एलएनजेपी रुग्णालयात याची चाचणी घेत आहे. तसेच लोकांना या चाचणीमध्ये सहभागी होण्याचं आवाहन करत आहे. दिल्लीमध्ये ही चाचणी एलएनजेपी रुग्णालयासोबतच राम मनोहर लोहिया रुग्णालयातही सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जवळपास 10 हजार लोकांवर अशा पद्धतीने कोरोना चाचणीचा प्रयोग केला जाणार आहे. ही चाचणी जर यशस्वी ठरली तर केवळ 30 सेकंदांमध्ये रुग्ण कोरोना संक्रमित आहे किंवा नाही याची माहिती मिळणार आहे. एलएनजेपी रुग्णालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या चाचणीमध्ये चार पद्धतींचा समावेश करण्यात आला आहे. मात्र यात व्हॉईस टेस्ट आणि ब्रिदिंग टेस्ट सर्वात महत्त्वाची आहे. याशिवाय आणखी दोन प्रकारच्या टेस्टचाही यात समावेश आहे.
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, 10 हजार जणांवर एकदा नाही तर दोनदा ही चाचणी करण्यात येणार आहे, त्यानंतर त्याच्या निष्कर्षापर्यंत पोहचणं शक्य होणार आहे. फक्त 30 सेकंदात कोरोना चाचणी शक्य झाली तर त्याचा मोठा फायदा होणार आहे. जेव्हापर्यंत लस विकसित होत नाही तोपर्यंत कोरोनासोबत जगण्यासाठी अशा पद्धतीच्या चाचणीचा लोकांना मोठा फायदा होऊ शकेल. येत्या काही दिवसांत या चाचणीचा परिणाम हाती येणार आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
Mumbai Rain Updates : घरीच थांबा! अतिवृष्टीमुळे कार्यालये बंद ठेवण्याचे पालिकेचे आवाहन
CoronaVirus News : "हर्ड इम्युनिटी' हा कोरोनावरचा यशस्वी उपाय नाही'; नव्या रिसर्चमधून मोठा खुलासा
Sushant Singh Rajput Case: सुशांतच्या आत्महत्या प्रकरणावर अमृता फडणवीसांनी केलं ट्विट, म्हणाल्या...