नवी दिल्ली - पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी एनआयएने आज जम्मूमधील एनआयए कोर्टात आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रामध्ये जैश ए मोहम्मद या संघटनेचा प्रमुख असलेल्या मौलाना मसूद अझहर, त्याचा भाऊ अब्दुल रशीद अझगर आणि दहशतवादी संघटनेतील अनेक इतर कमांडरांचा समावेश आहे.पाकिस्तानच्या इशाऱ्यावरून करण्यात आलेल्या या आत्मधातकी दहशतवादी हल्ल्याप्रकरणी सुमारे सात जणांना अटक केली आहे. १४ फेब्रुवारी २०१९ मध्ये पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये सीआरपीएफच्या ४० जवानांचा मृत्यू झाला होता.१३ हजार ५०० हून अधिक पानांचे हे आरोपपत्र डीआजी सोनिया नारंग आणि एसपी राकेश बलवान यांच्या नेतृत्वाखाली तयार करण्यात आलेल्या टीमने तपासानंतर पुरे केले आहे. एनआयए कोर्टात आरोपपत्र दाखल केल्यानंतर एनआयएच्या अधिकाऱ्यांनी या हल्ल्याचा मास्टर माइंड जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहर आणि त्याचा भाई असल्याचे कोर्टाला सांगितले. पाकिस्तानची गुप्तचर संघटना आयएसआयचे या हल्ल्याला सहकार्य होते. हल्ल्यासाठी वापरलेले तंत्र, सामुग्री आणि घटनास्थळावरून मिळालेले पुरावे हे या हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याचे सिद्ध करत आहेत, असे एनआयएच्या तपास अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.दरम्यान, गतवर्षी १४ फेब्रुवारी २०१९ रोजी जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफच्या ४० हून अधिक जवानांना वीरमरण आले होते. या हल्ल्यामुळे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर झालेल्या जीवितहानीमुळे संपूर्ण देश हादरून गेला होता. दरम्यान, या हल्ल्यासाठी फऊचा वापर झाल्याचे तपासातून उघड झाल्यानंतर हे आरडीएक्स नेमकं आलं कुठून असा सवाल सातत्याने विचारण्यात येत होता. मात्र आता पुलवामा हल्ल्याचा तपास करणाऱ्या एनआयएने या हल्ल्याबाबतचं ५ हजार पानांचं आरोपपत्र तयार केलं आहे. हे आरोपपत्र आज न्यायालयात सादर होण्याची शक्यता आहे. तसेच या आरोपपत्रामधून अनेक खळबळजनक दावे करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या आरोपपत्रामध्ये पाकिस्तानमधील जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अझहर आणि रौफ अझगर यांची नावे आरोपी म्हणून नमूद करण्यात आली आहेत. तसेच पुलवामामध्ये सीआरपीएफच्या ताफ्यामधील बसवर हल्ला करण्यासाठी वापरण्यात आलेले आरडीएक्स हे पाकिस्तानमधून आणण्यात आले होते, असे एनआयएच्या तपासात समोर आल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.
coronavirus: मसूद अझहरच पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाइंड, एनआयएने दाखल केले आरोपपत्र
By पंढरीनाथ कुंभार | Published: August 25, 2020 6:06 PM
१३ हजार ५०० हून अधिक पानांचे हे आरोपपत्र डीआजी सोनिया नारंग आणि एसपी राकेश बलवान यांच्या नेतृत्वाखाली तयार करण्यात आलेल्या टीमने तपासानंतर सादर केले आहे.
ठळक मुद्देएनआयएच्या अधिकाऱ्यांनी या हल्ल्याचा मास्टर माइंड जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहर आणि त्याचा भाई असल्याचे कोर्टाला सांगितलेपाकिस्तानची गुप्तचर संघटना आयएसआयचे या हल्ल्याला सहकार्य होतेहल्ल्यासाठी वापरलेले तंत्र, सामुग्री आणि घटनास्थळावरून मिळालेले पुरावे हे या हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याचे सिद्ध करत आहेत