मेरठ - भारतासह अनेक देशांनी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्याची घोषणा केली आहे. जगभरात आतापर्यंत कोरोनामुळे तब्बल 33, 976 लोकांचा मृत्यू झाला असून 7,22,088 लोकांना संसर्ग झाला आहे. तर 1,51,766 लोक बरे झाले आहेत. भारतात कोरोनामुळे आतापर्यंत 20 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही 1000 हून अधिक झाली आहे. याच दरम्यान मेरठमध्ये एकाच कुटुंबातील 13 जणांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये एकाच कुटुंबात कोरोनाचे 8 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे आता या कुटुंबात एकूण 13 जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. याआधी कुटुंबातील पाच जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर संपूर्ण कुटुंबातील लोकांची तपासणी करण्यात आली. 46 रुग्णांपैकी 11 जणांचे रिपोर्ट आले असून 35 जणांचे रिपोर्ट येणं बाकी आहे. यामुळे मेरठमधील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
रविवारी मेरठमध्ये कोरोनाची लागण झालेले एकाच कुटुंबातील 8 नवीन रुग्ण आढळले होत. मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राजकुमार यांनी याबाबत दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढून आता ती 13 वर पोहोचली आहे. तसेच कोरोनाची लागण झालेले हे सर्व 13 जण एकाच कुटुंबातील आहेत. मेरठमध्ये रुग्णांच्या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. कारण देखरेखीखाली असलेल्या एकूण 46 जणांपैकी केवळ 11 जणांचीच तपासणी होऊ शकलेली आहे. अजून 35 जणांचा रिपोर्ट येणे बाकी आहे. काही दिवसांमध्ये कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढू शकते असं डॉक्टरांनी म्हटलं आहे.
लॉकडाऊनमध्ये सर्वच जण घरात आहे. तर अनेकांना वर्क फ्रॉम करावं लागत आहे. पंतप्रधान मोदी लॉकडाऊनदरम्यान घरात काय करतात असा प्रश्न अनेकांना पडला आहे. मन की बातमधून रविवारी मोदींनी देशवासियांशी संवाद साधला. त्यावेळी एका व्यक्तीने त्यांना तुमचं फिटनेस रुटीन काय आहे? असा प्रश्न विचारला होता. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी लोकांना लॉकडाऊनच्या काळात प्रकृतीची कशी काळजी कशी घ्यावी हे सांगणारा एक व्हिडीओ शेअर केला आहे. नरेंद्र मोदी यांनी सोमवारी (30 मार्च) आपल्या ट्विटर अकाऊंटवरून आपला योगासनं करतानाचा 3D व्हिडीओ शेअर केला आहे. 'मी कोणताही फिटनेस तज्ज्ञ नाही. दररोज योगासनांचा सराव करणं हा माझ्या आयुष्यातील अंतर्गत विषय आहे. अनेक वर्षांपासून मी योगासनांचा सराव करत असून याचा मला फायदाही झाला आहे. मला खात्री आहे की, तुमच्याकडेही फीट राहण्यासाठी इतर पर्यायही उपलब्ध असतील, हे पर्याय देखील तुम्ही इतरांसोबत शेअर करायला हवेत' असं मोदींनी म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
Coronavirus: लॉकडाऊनदरम्यान पंतप्रधान काय करताहेत?, मोदींनी शेअर केला खास व्हिडिओ
Coronavirus : समोसा भिजवा दो... कंट्रोल रुमला फोन करणाऱ्याची पोलिसांनी खोड मोडली, अशी शिक्षा दिली
Coronavirus : ...म्हणून मोबाईल सेवा निशुल्क करा, प्रियंका गांधींचं टेलिकॉम कंपन्यांना आवाहन
Coronavirus : 'भारतात फक्त 21 नव्हे तर 49 दिवसांचा लॉकडाऊन आवश्यक'
Coronavirus: कोरोनाशी लढण्यासाठी Googleचा पुढाकार, सुंदर पिचाईंनी केली 5,900 कोटींची मदत