नवी दिल्ली – कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव रोखण्यासाठी देशात ३ मे पर्यंत लॉकडाऊन सुरु आहे. आतापर्यंत देशात २४ हजार जणांना कोरोनाची लागण झाली आहे तर ७०० हून अधिक लोकांचा जीव गेला आहे. लोकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये यासाठी सरकारकडून आवाहन करण्यात येत आहे. दरम्यान देशव्यापी लॉकडाऊनमध्ये शुक्रवारी दुकाने उघडण्याचा आदेश दिल्यानंतर शनिवारी केंद्रीय गृहमंत्रालयाने यावर स्पष्टीकरण दिलं आहे.
या स्पष्टीकरणामध्ये केंद्र सरकारने स्पष्ट केलं आहे की, कोणत्या प्रकारची दुकाने उघडली जातील आणि कोणत्या ठिकाणी उघडण्याची परवानगी दिली आहे. शुक्रवारी आदेश आल्यानंतर सरकारने सर्व प्रकारची दुकाने उघडण्याची परवानगी दिल्याचं सांगण्यात आलं त्यामुळे शनिवार या आदेशाबाबत केंद्र सरकारला स्पष्टीकरण द्यावं लागलं. गृह मंत्रालयाने शनिवारी सांगितले की, ग्रामीण भागातील सर्व दुकाने उघडण्याची परवानगी दिली आहे. फक्त तीच दुकाने बंद राहतील जी ग्रामीण भागातील शॉपिंग मॉलमध्ये असतील. त्याचप्रकारे शहरी भागातील एकमेव दुकाने, आसपासची दुकाने आणि निवासी संकुलांमध्ये असलेली दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे.
तसेच मार्केट, मार्केट कॉम्प्लेक्स आणि शॉपिंग मॉल्समध्ये असलेली दुकाने उघडण्यास परवानगी नाही. केवळ ई-कॉमर्स कंपन्यांना जीवनावश्यक वस्तूंची विक्री करण्याची परवानगी असल्याचं गृह मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. त्याचसोबत दारु आणि अन्य वस्तूंच्या विक्रीवर बंदी आहे. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये असलेल्या आदेशात दिलेल्यांना केंद्र सरकारच्या परवानगी दुकाने खुली करण्यात बंदी नाही. मात्र या सर्वांना सोशल डिस्टेंसिगचं पालन आणि सॅनिटायझेशनची पूर्ण काळजी घ्यावी असंही केंद्राने म्हटलं आहे.
आजपासून कोणती दुकाने उघडण्याची परवानगी
- शहरातील गल्लीमध्ये असणारी दुकाने
- रहिवाशी परिसरातील दुकाने
- ई-कॉमर्सच्या सहाय्याने होणारी विक्री
- ग्रामीण भागात असणारी सर्व दुकाने
ही दुकाने उघडण्याची परवानगी नाही
- शहरातील मार्केट कॉम्पेलेक्स आणि शॉपिंग मॉल्समधील दुकाने बंद राहतील
- शहरातील एकास एक लागून असलेली बाजारपेठेतील दुकाने
- दारुची कोणतीही दुकाने उघडण्यास बंदी
- ग्रामीण भागात येणाऱ्या मार्केट कॉम्पेलेक्स आणि मॉलमधील दुकाने बंदच राहणार
अन्य महत्त्वाच्या बातम्या
...म्हणून पुढील ४८ तास महत्त्वाचे; कोरोना प्रतिबंधक लसीची पहिल्यांदाच मानवावर चाचणी
ग्रामीण भागातील सर्व प्रकराची दुकाने उघडण्यास केंद्र सरकारची परवानगी
ग्रामीण भागातील सर्व प्रकराची दुकाने उघडण्यास केंद्र सरकारची परवानगी
‘या’ राज्यात १६ मे पर्यंत लॉकडाऊन वाढणार; सरकारच्या डॉक्टर समितीने दिले संकेत
व्वा! राज बाबू; वाईन शॉप सुरु करा, मनसेच्या मागणीवर शिवसेनेची खोचक भूमिका, सांगितलं...