नवी दिल्लीः कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता केंद्रानंही बऱ्याच राज्यांत मदत करण्यास सुरुवात केली आहे. केंद्रीय अर्थमंत्रालयानं अनेक राज्यांना मोठ्या प्रमाणात निधीचं वाटप केलं आहे. राज्यांना थोडं थोडकं नव्हे, तर 17,287.08 कोटी रुपये देण्यात आले आहेत. त्यापैकी 15व्या वित्त आयोगाच्या 'महसूल तूट अनुदाना'अंतर्गत 6,195.08 कोटी रुपये जाहीर केले आहेत. हे अनुदान 14 राज्यांना देण्यात आले आहे.या राज्यांना 6,195.08 कोटी रुपये मिळालेअर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी हा निधी जाहीर केल्याची माहिती दिली आहे. आंध्र प्रदेश, आसाम, हिमाचल प्रदेश, केरळ, मणिपूर, मेघालय, मिझोरम, नागालँड, पंजाब, सिक्कीम, तमिळनाडू, त्रिपुरा, उत्तराखंड आणि पश्चिम बंगाल यांना अनुदानाच्या अंतर्गत 6,195.08 कोटी रुपये देण्यात आले आहेत.
CoronaVirus: मोदी सरकारकडून राज्यांना तात्काळ कोट्यवधींचा निधी; ठोस उपाययोजना करण्याच्या सूचना
By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2020 9:52 PM