शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मविआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

CoronaVirus: नियमांत बदल! कामाच्या ठिकाणी थुंकल्यास होणार शिक्षा अन् भरावा लागणार जबर दंड

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2020 3:29 PM

संक्रमणाच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर बर्‍याच राज्यांनी लॉकडाऊन शिथिल केलेले नाही.

ठळक मुद्देआरोग्य मंत्रालयाने कार्यालये व कार्य स्थळांसाठी नवीन मार्गदर्शक सूचनांची नियमावली जारी केली आहे. या मार्गदर्शक सूचनांनुसार एखादी व्यक्ती कामाच्या ठिकाणी थुंकताना आढळली, तर त्या व्यक्तीला जबर शिक्षा होऊ शकतेराज्यांची मार्गदर्शक तत्त्वे जाहीर झाल्यानंतर आरोग्य मंत्रालयाने कार्यालये व कामाची ठिकाणे यासाठी नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत

नवी दिल्लीः देशात लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरू झाला असून, आरोग्य मंत्रालयाने कार्यालये व कार्य स्थळांसाठी नवीन मार्गदर्शक सूचनांची नियमावली जारी केली आहे. या मार्गदर्शक सूचनांनुसार एखादी व्यक्ती कामाच्या ठिकाणी थुंकताना आढळली, तर त्या व्यक्तीला जबर शिक्षा होऊ शकते, तसेच दंडही ठोठावला जाऊ शकतो. लॉकडाऊनचा चौथा टप्पा 18 ते 31 मेदरम्यान सुरू राहणार आहे. संक्रमणाच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर बर्‍याच राज्यांनी लॉकडाऊन शिथिल केलेला नाही.विशेष म्हणजे अशा काळात अशी काही राज्ये आहेत ज्यांनी 100% कर्मचार्‍यांसह सर्व कार्यालये उघडण्याची परवानगी दिली आहे. राज्यांची मार्गदर्शक तत्त्वे जाहीर झाल्यानंतर आरोग्य मंत्रालयाने कार्यालये व कामाची ठिकाणे यासाठी नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत, त्यासंदर्भातील महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊयात.आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचना१- कार्यालयातील कर्मचार्‍यांमध्ये अंतर कायम राखणं आवश्यक आहे. आसन व्यवस्थेसह अनेक गोष्टींसाठी 1 मीटर आवश्यक आहे.२- मास्क किंवा कपड्याने तोंड झाकून घ्यावं लागणार.३ - साबण किंवा सॅनिटायझरने छोट्या अंतराने हात स्वच्छ करा.4- आजारी असल्यास त्या विषयी स्थानिक प्रशासनास माहिती देणे बंधनकारक आहे.5- शिंकताना किंवा खोकताना तोंड झाकून घ्या.6- ऑफिस जाताना सावधगिरी बाळगा. सार्वजनिक ठिकाणी गोष्टींना स्पर्श करणे टाळा.7- कार्यालयात एखाद्यास कोरोना संसर्ग असल्यास संक्रमित व्यक्ती गेल्या 48 तासांत जिथे कुठे जाऊन आली, त्या भागाचं निर्जंतुकीकरण केले पाहिजे. निर्जंतुकीकरणानंतरच काम सुरू केले जाऊ शकते. कार्यालय किंवा इमारतीच्या संपूर्ण भागास सील करण्याची आवश्यकता नाही.8- एखाद्या कार्यालयात किंवा इमारतीत कोरोनाची अनेक प्रकरणे आढळल्यास 48 तास संपूर्ण कार्यालय सीलबंद केले जाईल. जोपर्यंत त्या कार्यालयात निर्जंतुकीकरण करून सुरक्षित घोषित केले जात नाही, तोपर्यंत प्रत्येकाला घरून काम करावे लागेल.देशात संसर्ग झालेल्यांची संख्या 1 लाखांच्या पुढे गेली आहेगेल्या 24 तासात कोरोना संसर्गाच्या 4,970 नवीन प्रकरणानंतर संक्रमित रुग्णांची एकूण संख्या 1,01,139 पर्यंत वाढली आहे. गेल्या 24 तासात 134 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर देशात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या आता 3,163 वर पोहोचली आहे. 110 दिवसांत भारताने हा आकडा ओलांडला आहे, तर तुर्कीमध्ये अवघ्या 44 दिवसांत रुग्णांचा हा आकडा ओलांडला आहे.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus: लसीशिवाय 'या' नव्या औषधानं ठीकठाक होतायत कोरोनाचे रुग्ण; चीनच्या प्रयोगशाळेचा दावा

Coronavirus: रेकॉर्ड ब्रेक उसळीनंतर सोन्याच्या भावात घसरण; जाणून घ्या आजचा दर

'त्या' संकटांनं केलं भीषण स्वरूप धारण, मोदी अन् शहांनी घेतला परिस्थितीचा आढावा

धक्कादायक! चीनच्या दबावाखाली येत नेपाळनं बनवला नकाशा अन् भारताच्या भागावर दाखवला 'कब्जा'

जम्मू-काश्मीर हा भारताचा अंतर्गत विषय; ढवळाढवळ करणार नाही, तालिबान्यांनी पाकिस्तानचे कान टोचले

CoronaVirus : लढ्याला यश! दोन औषधांनी ४ दिवसांत ६० कोरोनाबाधित रुग्ण झाले ठणठणीत

CoronaVirus: चीनमध्ये कोरोनाची दुसरी लाट येणार; इम्युनिटी कमी असलेल्या वयोवृद्धांचा धोका वाढणार

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य