नवी दिल्ली - कोरोनाचा अत्यंत संक्रमक डेल्टा आणि डेल्टा प्लस सारख्या व्हेरिएंटविरोधात लढण्यासाठी लशींचे मिश्रण एक ऑप्शन असू शकतो, असे एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी म्हटले आहे. हा निश्चितपणे एक मार्ग असू शकतो. मात्र, यावर कुठलाही निर्णय घेण्यापूर्वी आपल्याला आणखी डेटा एकत्रित करणे आवश्यक आहे, असेही गुलेरीया यांनी म्हटले आहे.
गेल्या महिन्यात सरकारनेही, आपण लशींच्या मिश्रणाच्या पर्यायावर विचार करत आहोत, असे म्हटले होते. नीती आयोगाचे सदस्य व्हीके पॉल यांनी म्हटले होते, की म्यूटेटेड व्हेरिएंटपासून सुरक्षितता आणि व्हॅक्सीन कव्हरेज वाढविण्यासाठी आम्ही हे पाऊल उचलू शकतो. यावरील परीक्षणाचे परिणाम काही महिन्यांतच येतील, अशी आशा आहे.
न्यूज वेबसाइट एनडीटीव्ही शी बोलताना डॉ. गुलेरिया म्हणाले, की प्राथमिक अभ्यासानुसार लसींचे मिश्रणदेखील एक पर्याय असू शकतो. परंतु आम्हाला अद्याप आणखी डेटाची आवश्यकता आहे. कोणते मिश्रण चांगले असेल, यावर आणखी संशोधनाची आवश्यकता आहे. पण हो, ही निश्चितपणे एक शक्यता आहे. लशींच्या मिश्रणावर इतर देशांतही प्रयोग सुरू आहेत.
जुलै अखेरपर्यंत भारतात दररोज १ कोटी नागरिकांच्या लसीकरणाचं लक्ष्य : डॉ. रणदीप गुलेरिया
डेल्टासाठी सिंगल डोस पुसेरा नाही - गुलेरियाडॉ. गुलेरिया म्हणाले, डेल्टा व्हेरिएंटविरूद्ध कदाचित सिंगल डोस पुरेसा ठरणार नाही. संशोधनातही सांगण्यात आले आहे, की सिंगल डोस केवळ 33 टक्केच संरक्षण देतो. जेव्हा दोन्ही डोस दिले जातात तेव्हा लोकांना 90 टक्के सुरक्षा मिलते. तसेच, डेल्टा व्हेरिएंटविरूद्ध कदाचित सिंगल डोस पुरेसा ठरणार नाही, ही आपल्यासाठी चिंतेची गोष्ट आहे. अशात आपल्याला दुसरा डोस देण्याची आवश्यकता आहे. पण तो फार आधीच द्यावा लागेल. जेणे करून सर्वांची सुरक्षितता निश्चित करता येईल, असेही गुलेरिया म्हणाले.
लशीच्या मिश्रणासंदर्भात दोन रिपोर्ट पब्लिश -पहिला रिपोर्ट - गेल्या महिन्यात द लॅन्सेट जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका ब्रिटिश स्टडीनुसार, सर्वप्रथम लोकांना एस्ट्राजेनेका म्हणजेच कोविशिल्डचा डोस देण्यात आला. यानंतर दुसरा डोस फायझरचा देण्यात आला. यात काही वेळापर्यंत याचे साइड इफेक्ट्स दिसून आले होते. मात्र, ते सौम्य स्वरुपाचे होते. याच्या परिणामांचा डेटा मिळणे अद्याप बाकी आहे.
दुसरा रिपोर्ट : यापूर्वी स्पेनमध्ये झालेल्या एका अभ्यासात कोविशिल्ड आणि फायझरच्या डोसचे मिश्रण केल्यानंतर ती सुरक्षित आणि प्रभावी असल्याचे समोर आले होते.
डॉ. गुलेरिया म्हणाले, तिसऱ्या लाटेसंदर्भात बोलले जात आहे, की तिसरी लाट ही दुसऱ्या लाटेच्या तुलनेत अधिक घातक ठरेल. पण माला वाटते, की येणारी लाट तेवढी घातक नसेल. आपल्याला दुसऱ्या लाटेपासून धडा घेत तिसऱ्या लाटेचा सामना करावा लागेल.