नवी दिल्ली : जगभरात कोरोना संकटामुळे लॉकडाऊन करण्यात आला आहे. यामुळे विविध देशांमध्ये परदेशांतील नागरिक अडकले आहेत. काही कामानिमित्त, काही पर्यटनासाठी गेले होते. मात्र, हवाई वाहतूकच बंद केल्याने या नागरिकांना परदेशांतच अडकून रहावे लागले आहे. आता भारत सरकारने विमाने आणि नौदलाच्या मदतीने परदेशांमध्ये अडकलेल्या लोकांना आणण्यासाठी पाऊल उचलले आहे.
परदेशामध्ये अडकलेल्या नागरिकांना ७ मे पासून टप्प्याटप्प्यामध्ये आणण्यात येणार आहे. गृह मंत्रालयाने जारी केलेल्या सूचनेनुसार विमाने आणि नौदलाच्या जहाजांद्वारे भारतीयांना मायदेशी आणण्यात येणार आहे. यासाठी एक मोहिम आखण्यात आली असून भारतीय उच्चायुक्तालयांकडून परदेशांमध्ये अडकलेल्या नागरिकांची यादी बनविण्याचे काम सुरु आहे. ही संख्या खूप मोठी असून यासाठी काही महिने लागण्याची शक्यता आहे.
याआधी वुहानमध्ये फसलेल्या भारतीयांना सरकारी खर्चाने भारतात आणण्यात आले होते. मात्र, नव्या सूचनेनुसार परेदशांत अडकलेल्या भारतीयांना स्वखर्चाने परतीचा प्रवास करता येणार आहे. येत्या ७ मे पासून त्यांना आणण्यास सुरुवात केली जाणार आहे. विमानात किंवा जहाजांमध्ये बसण्याआधी प्रवाशांची तपासणी केली जाणार आहे. ज्या प्रवाशांमध्ये कोरोनाची लक्षणे आढणार नाहीत, त्यांनाच भारतात येण्याची परवानगी दिली जाणार आहे. प्रवासादरम्यान भारतीय आरोग्य विभाग आणि विमानोड्डाण मंत्रालयाच्या सूचनांचे पालन करावे लागणार आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या...
CoronaVirus चिंताजनक! मुंबईत आज दिवसभरात ५१० रुग्णांचे निदान; १८ मृत्यूंची नोंद
बापरे! कोरोनामुळे वृद्धाचा मृत्यू; मुंबईतील हॉस्पिटलने १६ लाखांचे बिल आकारले
गिलगिट बाल्टिस्तान तत्काळ खाली करा; भारताचा पाकिस्तानला गंभीर इशारा
CoronaVirus लॉकडाऊनमध्ये भारतासारखीच सूट दिली; 'या' देशांमध्ये कोरोनाचा धोका वाढला