नवी दिल्ली - जनता कर्फ्युदिनी नागरिकांनी सायंकाळी ५ वाजता दाखवलेल्या अतिउत्साहाबद्दल मोदींनी ट्विटरवरुन नाराजी व्यक्त केली होती. तसेच, लोकांनी अद्यापही कोरोनाला गंभीरतेनं घेतलं नसल्याचं सांगत मोदींनी संताप व्यक्त केला होता. त्यानंतर, पुन्हा एकदा मोदींनी देशातील जनतेशी संवाद साधला आहे. त्यात, पुढील २१ दिवसांसाठी देशात लॉक डाऊन करण्यात येत असल्याचे मोदींनी जाहीर केले. आज रात्री १२ वाजल्यापासून हा लॉक डाऊन करण्यात येत असल्याचे मोदींनी सांगितले. हे २१ दिवस जर आपण नाही सांभाळले तर आपला देश २१ वर्षे मागे जाऊ शकतो, असेही मोदी म्हणाले होते. मात्र, अद्यापही नागरिक रस्त्यावर आणि एकत्र येत आहेतच.
कोरोनाच्या संकटाची किंमत आपल्याला मोजावी लागणार आहे. देशाच्या आर्थिक प्रगतीत याचा मोठा विपरीत परिणाम होणार आहे. केंद्र सरकारकडून कोरोनाच्या प्रादुर्भाव संकटासाठी, देशातील आरोग्यसेवेला गरज म्हणून १५ हजार कोटी रुपयांची तरतूद केलीय, असेही मोदींनी मंगळवारी सांगितले. त्यानंतर, लोकांनी घरातच बसावे, यासाठी मोदींकडून वारंवार सांगण्यात येत आहे. आता, मोदींनी एका छोट्याशा जाहिरातीमधून लोकांना घऱी बसण्याचेआवाहनं केलंय. विशेष म्हणजे हे काम देशातील बाल सेनेाच करु शकते, असा विश्वासही मोदींनी व्यक्त केला आहे
पंतप्रधाननरेंद्र मोदींनी देशातील बाल सेना म्हणजेच लहान मुलांवर विश्वास असल्याचं म्हटलंय. कोरोनाच्या लढाईत तेच मोठं योगदान देऊ शकतात, असेही मोदींनी एका जाहिरातीच्या माध्यमातून सूचवलंय. मोदींनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत एक शाळकरी मुलगी आपल्या वडिलांना घरातून बाहेर जाण्यास मज्जाव करते. तसेच, २१ दिवस देशातील कुणीही बाहेर पडू नये, असेही ती म्हणते. कोरोनाला हद्दपार करण्यासाठी हे करायचंय, असे म्हणत आपल्या कुटुंबीयांची सुरक्षा आणि काळजी लहानग्यांना चांगल्या रितीने समजते, असेही या जाहिरातीतून सूचविण्यात आलंय. पंतप्रधाननरेंद्र मोदींनी आपल्या ट्विटमधून हा संदेश दिला आहे.