शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
8
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
9
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
10
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
11
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
12
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
13
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
14
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
15
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
16
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
17
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
18
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
19
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
20
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?

Coronavirus : कोरोनाकाळातील सभा भोवली, ४०० हून अधिक नक्षलवाद्यांना कोरोनाची लागण झाली, १० जणांचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2021 9:13 PM

Coronavirus in India: नक्षलवाद्यांचा अड्डा बनलेल्या महाराष्ट्र-छत्तीसगडच्या सीमेवरील जंगलांमध्येही कोरोनाने शिरकाव केला आहे. मिळत असलेल्या माहिती नुसार ४०० हून अधिक नक्षलवाद्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.

रायपूर - कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेने गेल्या सव्वा महिन्यापासून देशभरात धुमाकूळ घातला आहे. देशातील विविध भागात कोरोनाचा फैलाव झाला असून, आता नक्षलवाद्यांचा अड्डा बनलेल्या महाराष्ट्र-छत्तीसगडच्या सीमेवरील जंगलांमध्येही कोरोनाने शिरकाव केला आहे. मिळत असलेल्या माहिती नुसार ४०० हून अधिक नक्षलवाद्यांना कोरोनाचा संसर्ग झाला असून, १० नक्षलवाद्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. (More than 400 Naxalites infected with coronavirus, 10 Death)

छत्तीसगडमधील बस्तर येथील नक्षलवाद्यांचा दलममध्ये कोरोनाचा फैलाव झाला आहे. सुमारे ४०० नक्षलवादी कोरोनाबाधित झाले आहेत. तर १० नक्षलवाद्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, मोठ्या प्रमाणात कोरोनाचा शिरकाव झाल्याने नक्षलवाद्यांच्या गोटामध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. काही दिवसांपूर्वी नक्षलवाद्यांकडून छत्तीसगडमधील बिजापूर आणि सुकमा जिल्ह्यातील सीमाभागांमध्ये एका सभेचे आयोजन केले होते. या सभेमध्ये शेकडो नक्षलवादी सहभागी झाले होते. आता याच सभेमधून कोरोनाचा फैलाव झाल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, संपूर्ण देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. गेल्या राही दिवसांत कोरोनाच्या रुग्णांची संख्या घटताना दिसत आहे. मात्र देशभरात अद्यापही लाखो रुग्णांचे निदान होत आहे. तसेच एकूण कोरोनाबळींचा आकडाही अडीच लाखांच्या जवळ पोहोचला आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतnaxaliteनक्षलवादी