नवी दिल्ली : ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भारतात सापडलेल्या कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या अमेरिका, ब्राझीलमधील नव्या रुग्णांच्या संख्येपेक्षाही जास्त आहे. देशात शुक्रवारी कोरोनाचे ६१,३३७ नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे या आजाराच्या रुग्णांची एकूण संख्या २०,८८,६११ झाली आहे. कोरोनामुळे आणखी ९३३ जण मरण पावले असून बळींची एकूण संख्या ४२,५१८ वर पोहोचली आहे, तर देशात मृतांचे प्रमाण २.0४ टक्के इतके कमी झाले आहे. सध्या देशात ६,१९,०८८ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू असून १४,२७,००६ जण या आजारातून पूर्णपणे बरे झाले आहेत. कोरोनातून पूर्णपणे बरे होणाºया रुग्णांचे प्रमाण ६८.३२ टक्के झाले आहे. सलग दहाव्या दिवशी कोरोनाचे ५० हजारांहून अधिक नवे रुग्ण सापडले.कोरोना बळींची संख्या तामिळनाडूमध्ये ४,६९०, दिल्लीत ४,०८२, कर्नाटकमध्ये २,९९८, गुजरातमध्ये २६०५, उत्तर प्रदेशमध्ये १,९८१, पश्चिम बंगालमध्ये १,९५४, आंध्र प्रदेशमध्ये १,८४२, मध्य प्रदेशमध्ये ९६२ इतकी आहे. अन्य राज्यांतही कोरोनामुळे बळी गेलेल्यांची लक्षणीय संख्या आहे. या संसगार्मुळे मरण पावलेल्यांपैकी ७० टक्के लोकांना एकापेक्षा जास्त व्याधी होत्या.कोरोना चाचण्या २ कोटी ३३ लाखइंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी ५,९८,७७८ कोरोना चाचण्या करण्यात आल्या. आता देशात कोरोना चाचण्यांची एकूण संख्या २,३३,८७,१७१ झाली आहे.६ दिवसांत देशात 3,28,903 नवीन रुग्णकेंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार आॅगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यातील सहा दिवसांत कोरोनाचे ३,२८,९०३ रुग्ण सापडले. या कालावधीत अमेरिकेमध्ये ३,२६,१११ व ब्राझीलमध्ये २,५१,२६४ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. या महिन्याच्या पहिल्या आठवड्यातील सहापैकी चार दिवशी म्हणजे २, ३, ५ व ६ आॅगस्ट रोजी जगातील कोरोनाचे सर्वाधिक नवे रुग्ण भारतात सापडले होते.देशामध्ये कोरोना रुग्णांच्या एकूण संख्येने २० लाखांचा टप्पा गुरुवारी ओलांडला. कोरोना रुग्णसंख्येचा १० लाखांवरून वीस लाखांपर्यंतचा प्रवास भारताने अमेरिका, ब्राझीलपेक्षाही वेगाने केला आहे. २० लाख रुग्णसंख्या झाल्याच्या टप्प्यावर कोरोनाचा संसर्ग वाढण्याचे भारतातील प्रमाण ३.१ टक्के असून ते इतर देशांपेक्षा जास्त आहे.मजूर पुन्हा कामाच्या ठिकाणीउत्तर प्रदेशातील मजूर पुन्हा आपल्या कामाच्या ठिकाणी दाखल होत आहेत. अशाच एका मजुराचे नवी दिल्लीत दाखल झाल्यानंतर आनंद विहार बस स्थानकावर शनिवारी टिपलेले छायाचित्रे.
CoronaVirus News: ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भारतात सापडले सर्वाधिक रुग्ण; अमेरिका, ब्राझीलला टाकलं मागे
By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2020 3:02 AM