भोपाळ: गेल्या काही दिवसांपासून भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. कोरोनाबाधित आणि कोरोनामुळे होणारे मृत्यू दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळत आहेत. कोरोनाच्या वाढत्या उद्रेकामुळे कोरोना लस, ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शन, बेड्स यांचा तुटवडा जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी लॉकडाऊन लावण्यात आले आहे. मात्र, तरीही नागरिकांकडून लॉकडाऊनच्या नियमांचे पालन होताना दिसत नाही. यावर, सुमारे ४० मिनिटे रामनाम लिहिण्याची अजब शिक्षा मध्य प्रदेशात करण्यात येत आहे. (coronavirus mp cop asked to pen down the name of lord ram after violating lockdown rules)
मध्य प्रदेशच्या सतना जिल्ह्यात लॉकडाऊनचे नियम मोडणाऱ्या नागरिकांना शिक्षा देण्यासाठी एका पोलीस उपनिरीक्षकाने नवीन शक्कल लढवली आहे. सतना जिल्ह्यातील कोलगवा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संतोष सिंह यांनी अनोखी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. पोलीस लॉकडाउनचे नियम मोडणाऱ्या नागरिकांकडून कागदावर प्रभू श्रीरामांचे नाव लिहून घेत आहेत.
दिल्ली पोलिसांची गौतम गंभीर यांना क्लीन चिट; हायकोर्टाला अहवाल सादर
३० ते ४० मिनिटे श्रीराम नाम
पोलिसांनी गेल्या काही दिवसांमध्ये नियम मोडणाऱ्या नागरिकांना पकडून ३० ते ४० मिनिटे त्याच्यांकडून रामाचे नाव लिहून घेण्याचा उपाय सुरू केला आहे. कोरोना कर्फ्यूची कडक अंमलबजावणी करण्यासाठी २० चेक पॉईंट्स तयार करण्यात आले आहेत. ही शिक्षा देण्यासाठी जवळच्या नागरिकांनी त्यांना काही वह्यासुद्धा दिल्या आहे.
अरेरे! घरात विलगीकरणासाठी जागा नाही; पठ्ठ्याने झाडावर काढले तब्बल ११ दिवस
या शिक्षेची जबरदस्ती नाही
यापूर्वी आम्ही नियम मोडल्याची शिक्षा म्हणून उठा बश्या काढायला सांगत किंवा तासभर बसून नंतर सोडून देत असत. मला वाटले की ते नुसते बसण्यापेक्षा त्याऐवजी भगवान रामाचे नाव लिहू शकतात. त्यामुळे आम्ही ही शिक्षा सुरू केली. आतापर्यंत कोणावरही या शिक्षेची जबरदस्ती केली नाही. हा उपाय कोणाच्याही धार्मिक श्रद्धेच्या विरोधात नाही. लोक त्यांच्या इच्छेने लिहितात. आतापर्यंत जवळपास २५ लोकांना ही शिक्षा झाली आहे. तसेच याबद्दल आम्हाला कोणही तक्रार केलेली नाही, अशी प्रतिक्रिया उपनिरीक्षक संतोष सिंह यांनी दिली.