लखनऊ – कोरोनाच्या धास्तीनं संपूर्ण देशभरात २१ दिवसांचा लॉकडाऊन करण्यात आला आहे. या लॉकडाऊनमुळे अनेक सामान्य लोकांना त्रास सहन करावा लागत असला तरी तो आरोग्याच्या दृष्टीकोनातून गरजेचा आहे. या परिस्थितीत पोलिसांकडून केलं जाणारं लयभारी काम सर्वांसाठी कौतुकाचा विषय बनलं आहे. अशीच एक कहाणी उत्तर प्रदेशातील लखनऊ येथे घडली आहे ती ऐकून तुम्हालाही पोलिसांबद्दल आणखी गर्व वाटेल.
तमन्ना आणि तिचा पती अनीस खान लखनऊ येथे राहतात. संकटात असणाऱ्या या मुस्लीम कुटुंबाला हिंदू पोलीस अधिकाऱ्याने केलेली मदत इतकी भावली की या दामप्त्यांनी त्यांच्या नवजात मुलाचं नाव पोलिस अधिकाऱ्याच्या नावावर रणविजय खान असं लिहिलं. बरेलीत राहणारी तमन्नाचे पती अनीस खान काही कामानिमित्त १० दिवसांपूर्वी नोएडा येथे गेले होते. ते पुन्हा परतणार होते इतक्यात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. दुसरीकडे तमन्ना गरोदर होती. अनीस नोएडावरुन परतू शकत नव्हता. बुधवारी तमन्नाने सोशल मीडियावर तिची समस्या व्हिडीओच्या माध्यमात शेअर केली.
व्हिडीओ बरेली येथील पोलीस अधिक्षक यांच्याकडे पोहचला. त्यांनी तातडीनं नोएडा येथील एडीसीपी कुमार रणविजय सिंह यांना या प्रकरणी मदत करण्यास सांगितले. त्यावेळी रणविजय एका मेडिकल शॉपमध्ये काही औषध विकत घेत होते. दुसरीकडे तमन्ना हीची तब्येत बिघडत होती. याचदरम्यान रणविजयने फोन करुन अनीसच्या लोकेशनची माहिती घेतली. मिळालेल्या माहितीनुसार तमन्नाच्या पोटात दुखू लागले. त्यावेळी घरी कोणी नव्हतं. बुधवारी रात्री ११ वाजता रणविजयने अनीसला बरेली पाठवण्यासाठी गाडीची व्यवस्था केली.
रात्रीच्या अडीच वाजता रणविजय बरेलीला पोहचले. तोपर्यंत लोकांच्या मदतीने तमन्नाला हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. नवभारत टाइम्सशी बोलताना अनीसने सांगितले की, जेव्हा माझ्या पत्नी मला पाहिले त्यावेळी तिच्या डोळ्यातून पाणी आले. मी बरेलीला पोहचल्यानंतर ४५ मिनिटांनी मी वडील झाल्याचं माहित पडलं. आम्ही मुलाचं नावं रणविजय खान ठेवलं आहे. माझ्या पत्नीला खात्री नव्हती मी पोहचेन पण पोलिसांच्या मदतीने हे शक्य झालं.
एडीसीपी रणविजय यांनी सांगितले की, मी फक्त माझे कर्तव्य निभावलं. लोक पोलिसांना कठोर समजतात. पण आम्ही जितके कठोर वागतो पण तितकचं माणुसकी जाणतो. कोणाची पीडा आम्ही पाहू शकत नाही. एक महिला आई बनते त्यावेळी तिचा नवरा तिथं असणं गरजेचं आहे. मी प्रयत्न केले त्यात यश मिळालं असं ते म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
खळबळजनक! मुस्लीम धार्मिक कार्यक्रमात किती जणांना कोरोना?; ४ राज्यात शोधमोहीम सुरु
गृह, वाहन अन् इतर प्रकारच्या कर्जदारांना दिलासा; RBIनं केली मोठी घोषणा
कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी राजकीय नेते सरसावले; पाहा कोणत्या नेत्याने किती मदत केली?
‘लॉकडाऊन’ बाधितांसाठी १.७० लाख कोटींचे पॅकेज
राज्यात कोरोनाग्रस्तांची आकडेवारी चिंताजनक; वयोवृद्धांपेक्षा ‘या’ वयोगटात सर्वाधिक रुग्ण