नवी दिल्ली : देशात कोरोना व्हायरसला थोपविण्यासाठी मोदी सरकारने २४ मार्चला २१ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली होती. उद्या याचा शेवटचा दिवस आहे. या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सकाळी १० वाजता देशाला संबोधित करणार आहेत. याची माहिती त्यांनी ट्विट करून दिली आहे.
गेल्या २१ दिवसांच्या काळात मोदींनी दोन वेळा देशाला संबोधित केले आहे. यावेळी त्यांनी पहिल्यांदा कोरोनाशी लढणाऱ्या डॉक्टर, नर्स आरोग्य सेवकांचे मनोबल उंचावण्यासाठी थाळी वाजविण्याचे आवाहन केले होते. मात्र, यावेळी मोठ्या प्रमाणावर लोक रस्त्यावर आले होते. यानंतर त्यांनी दुसऱ्यांदा घरातील लाईट बंद करून दिवा लावण्यास सांगितले होते. यावेळी लोकांनी काहीशी सावधगिरी बाळगली होती. लॉकडाऊनच्या घोषणेनंतर दुसऱ्याच दिवसापासून देशभरात स्थलांतरित झालेल्या मजुरांनी गावाकडची वाट पकडल्याने लॉकडाउनचा फज्जा उडाल्याचे चित्र होते. मात्र, राज्य सरकारांना मोदींनी आवाहन करत लॉकडाऊन कडक अंमलबजावणी करण्यास सांगितल्याने या रस्त्यावरून पायी जात असलेल्या मजुरांना सीमांवरच थांबविण्यात आले होते. तर अनेकांना गावात क्वारंटाईन करण्यात आले होते.
लॉकडाऊन काळात विनाकारण बाहेर पडणाऱ्या लोकांनी पोलिसांचा लाठ्यांचा प्रसादही खाल्ला. तर काहींनी पोलिसांनाही मारहाण केल्याचे समोर आले होते. काही ठिकाणी तपासणीसाठी गेलेल्या पोलिसांना, डॉक्टर, नर्सनाही मारहाणीचे प्रकार घडले होते. महाराष्ट्रात लॉकडाऊन वाढविलेला असताना आता मोदी उद्या काय घोषणा करतात, याकडे साऱ्यांचे लक्ष लागलेले आहे. लॉकडाूनचा कालावधी वाढविण्याची मागणी अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी केली आहे. तर सुत्रांनुसार मोदी येत्या १ मे पासून आर्थिक आणीबाणी जाहीर करतील अशी शक्यता वर्तविली जात आहे.
Corona Virus Lockdown अखेर आदेश आला! राज्यातील लॉकडाऊन ३० एप्रिलपर्यंत वाढला
मोदी सरकार मोठा दिलासा देणार; लॉकडाऊन काळात 'दुकाने', उद्योग सुरु ठेवण्याची मुभा
आय अॅम सॉरी! गंगा किनारी १० परदेशी फिरताना सापडले; शिक्षा पाहून 'हसाल'
बापरे! केवळ 8 जणांनी तब्बल १९०० जणांना केले कोरोना पॉझिटिव्ह
भारतात 'कोरोना बॉम्ब' फोडण्याच्या तयारीत; नेपाळच्या राजकारण्याला अटक