नवी दिल्ली: कोरोनाविरुद्धच्या लढाईत आपण सगळे एक आहोत, आपण सर्व मिळून एकत्रितपणे हा संघर्ष करत आहोत, यासाठी येत्या रविवारी रात्री ९ वाजता ९ मिनिटं दिवा, मेणबत्ती, टॉर्च किंवा मोबाईलचा फ्लॅश पेटवू, असं आवाहन आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं. यावरुन कॅबिनेट मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मोदींवर टीका केली. देशाला इतकंही मुर्खात काढू नका, अशा शब्दांत आव्हाड मोदींवर बरसले.'भारताने कोरोनाविरुद्धची लस शोधली, एकालाही मास्क कमी पडू देणार नाही. डॉक्टरांच्या मागे आम्ही उभे आहोत. कुठलाही गरीब उपाशी झोपणार नाही, असं भाषण मोदींकडून अपेक्षित होते. तर त्यांनी ह्या संकटाचाही इव्हेंट करायचं ठरवलं. म्हणे... अंधार करा आणि बॅटरी पेटवा. देशाला इतकेही मुर्खात काढू नका,' असं आव्हाड यांनी ट्विटमध्ये म्हटलं. मेणबत्त्या पेटवण्यापेक्षा मी गरिबांना दान करेन, असं आव्हाड म्हणाले आहेत.
CoronaVirus: नऊ वाजता नऊ मिनिटं मेणबत्ती पेटवण्यापेक्षा...; आव्हाडांनी सांगितली योजना
By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2020 3:03 PM