नवी दिल्ली - दिवाळीमुळे वाढलेली गर्दी, प्रदूषण, राजधानी दिल्लीमध्ये वाढत असलेली कोरोनाच्या रुग्णांची संख्या, देशात कोरोनाची दुसरी लाट येणार असल्याची तज्ज्ञांकडून व्यक्त होत असलेली भीती, या पार्श्वभूमीवर ऐन दिवाळीत कोरोनाविरोधात देशासाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या २४ तासांमध्ये देशातील कोरोनाच्या रुग्णसंख्येमध्ये कमालीची घट दिसून आली आहे. गेल्या २४ तासांत देशभरात कोरोनाच्या ३० हजार ५४८ नव्या रुग्णांची नोंद झाली. गेल्या चार महिन्यांतील एका दिवसात सापडलेली सर्वात कमी रुग्ण संख्या आहे. यापूर्वी १५ जुलै रोजी देशात २९ हजार ४२९ रुग्णांची नोंद झाली होती.आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या मादितीनुसार, गेल्या २४ तासांत देशभरात कोरोनाचे ३० हजार ५४८ नवे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या ही ८८ लाख ४५ हजार १२७ वर पोहोचली आहे. तर गेल्या दिवसभरात देशात ४३५ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील मृतांची एकूण संख्या १ लाख ३० हजार ०७० एवढी झाली आहे.
coronavirus: दिलासादायक! देशभरात कोरोनाच्या नव्या रुग्णसंख्येत पुन्हा मोठी घट, दिवसभरात सापडले एवढे रुग्ण
By बाळकृष्ण परब | Published: November 16, 2020 10:47 AM
CoronaVirus Positive News : गेल्या चार महिन्यांतील एका दिवसात सापडलेली सर्वात कमी रुग्ण संख्या आहे. यापूर्वी १५ जुलै रोजी देशात २९ हजार ४२९ रुग्णांची नोंद झाली होती.
ठळक मुद्देगेल्या २४ तासांत देशभरात सापडले कोरोनाचे ३० हजार ५४८ नवे रुग्ण देशातील कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या पोहोचली ८८ लाख ४५ हजार १२७ वर दिवसभरात देशात ४३५ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील मृतांची एकूण संख्या १ लाख ३० हजार ०७० एवढी झाली