नवी दिल्ली : दिवसेंदिवस काेराेनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. रुग्णसंख्येत सलग १८ व्या दिवशी माेठी वाढ नाेंदविण्यात आली असून, रविवारी ६ महिन्यांतील उच्चांकी रुग्णसंख्या नाेंदविण्यात आली. तब्बल ६२ हजार ७१४ नवे रुग्ण आढळले असून, ३०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण काेराेना पाॅझिटिव्हिटीचा सर्वाधिक २२.७८ टक्के दर महाराष्ट्राचा आहे. गेल्या वर्षी ऑक्टाेबरमधील दरराेजच्या रुग्णसंख्येएवढे रुग्ण आढळत असून, केवळ महिनाभरातच वाढ झाली आहे. (New coronavirus cases in 62,000 countries, six-month high)रविवारी ६२ हजार ७१४ नवे रुग्ण नाेंदविण्यात आले, तर ३१२ जणांचा मृत्यू झाला. सलग दुसऱ्या दिवशी ६२ हजारांहून अधिक रुग्णसंख्या नाेंदविण्यात आली आहे. यापूर्वी १६ ऑक्टाेबर २०२० नंतरची एका दिवसातील ही सर्वाधिक रुग्णसंख्या आहे, तर २५ डिसेंबर २०२० च्या ३३६ मृत्यूनंतर सर्वाधिक मृत्यू नाेंदविण्यात आले आहेत. देशातील सक्रिय रुग्णांची संख्या ४ लाख ८६ हजार ३१० झाली आहे. काेराेनातून १ काेटी १३ लाख २३ हजार ७६२ रुग्ण आतापर्यंत बरे झाले आहेत. वाढलेल्या रुग्णसंख्येचा रुग्ण बरे हाेणाच्या टक्केवारीवर परिणाम झाला असून, हा दर ९४.५८ टक्क्यांपर्यंत आला आहे, तर मृत्युदर १.३५ टक्के झाला आहे. देशभरात एकूण १ लाख ६१ हजार ५५२ जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक ५४०७३ जणांचा मृत्यू झाला आहे. तामिळनाडूमध्ये १२६५९, कर्नाटकमध्ये १२४९२, दिल्लीत १०९९७, पश्चिम बंगालमध्ये १०३२२, उत्तर प्रदेशात ८७८३, आंध्र प्रदेशात ७२०३ आणि पंजाबमध्ये ६६२१ जणांच्या मृत्यूची नाेंद करण्यात आली.
३१२ जणांचा मृत्यू देशातील ८ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये काेराेनाचा सर्वाधिक पाॅझिटिव्हिटी दर आहे. या राज्यांमध्ये देशाच्या ५.०४ टक्क्यांहून अधिक दर नाेंदविण्यात आला आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक पाॅझिटिव्हिटी दर महाराष्ट्र : २२.७८ टक्केचंदीगड : ११.८५पंजाब : ८.४५गाेवा : ७.०३पुडुचेरी : ६.८५छत्तीसगढ : ६.७९मध्यप्रदेश : ६.६५ हरयाणा : ५.४१ टक्के ८४% गेल्या २४ तासांमधील नव्या रुग्णसंख्येत या राज्यांतील ८४ टक्के रुग्ण आहेत. महाराष्ट्राची आघाडीएकूण लसीकरणात महाराष्ट्राने आघाडी घेतली आहे. राज्यात ५३.९ लाख जणांचे लसीकरण झाले आहे. राजस्थानमध्ये ५३.१ लाख जणांना लस दिली.