शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाला काय विचारावं हे पण उद्धव ठाकरेंना माहिती नाही"; राज ठाकरेंची बोचरी टीका
2
काँग्रेसची पाकिस्तानची भाषा, पीएम मोदींचा पुण्यातून हल्लाबोल; शरद पवारांवर एक शब्दही नाही
3
"माझा मुलगा हॉस्पिटलमध्ये असताना हा माणूस विकला गेला"; राज ठाकरे दिलीप लांडेंवर भडकले
4
अमित शाहांचा मुंबईकरांना शब्द; म्हणाले, "बांगलादेशी, रोहिग्यांना वेचून वेचून बाहेर काढणार"
5
"फूट पडली तर काँग्रेस तुमचं आरक्षण हिरावून घेईल..."; मोदींनी विरोधकांवर त्यांचाच डाव उलटवला!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'माझी बॅग तुझ्याकडेच देतो, घेऊन येत जा,मात्र त्यातील कपडे चोरू नको'; उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचले
7
"भाजपसाठी काश्मीर सत्तेपेक्षा प्रिय, उद्धव ठाकरेंनी सांगावं की..."; अमित शाहांचा मविआवर हल्लाबोल
8
महायुतीला किती जागा मिळतील? CM शिंदेंनी थेट आकडाच सांगितला; म्हणाले, “जनतेचा विश्वास...”
9
"जेव्हा-जेव्हा हिंदूंमध्ये फूट पडली, तेव्हा-तेव्हा देशाचा एक भाग वेगळा झाला"; 'बटेंगे तो कटेंगे'वर शेखावत थेटच बोलले
10
"मुख्यमंत्री केलं तर वरचढ होईल म्हणून अजित पवारांना पण...; भुजबळांचा शरद पवारांविषयी गौप्यस्फोट
11
भाजपच्या सभेत मिथुन चक्रवर्तींचे पाकिट चोरले; स्थानिक नेत्यांची चोराला अपील, व्हिडिओ व्हायरल
12
"५ वर्षापूर्वी अमित शाह, शरद पवार अन् गौतम अदानी..."; अजित पवारांचा गौप्यस्फोट
13
“उद्धव ठाकरेंच्या बॅगेत असे काय आहे? एवढी आगपाखड करायचे कारण काय?”; शिंदे गटाने डिवचले
14
"समजूत काढायला गेले अन् तिथेच बसले"; येवल्यात भुजबळांवर शरद पवारांचा हल्लाबोल
15
Shocking! एक कार शेकडोंच्या गर्दीत घुसली; 35 जणांचा मृत्यू, ४३ जखमी, ड्रायव्हर कोमात
16
डोनाल्ड ट्रम्प यांनी कुणाला बनवलं NSA? नाव जाणून पाकिस्तानलाही धढकी भरेल; भारतासाठी आहेत खास!
17
किरकोळ महागाई RBI च्या हाताबाहेर गेली; रेपो रेटमध्ये कपात होणे शक्य नाही?
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्रिपदावरुन महाविकास आघाडीमध्ये वाद? उद्धव ठाकरेंनी एका शब्दात विषयच संपवला
19
महाराष्ट्रातील निवडणुकीसाठी काँग्रेसचा 'मेगा प्लॅन'! पुढच्या ६ दिवसांत काय करणार? २ गोष्टींवर असेल सर्वधिक फोकस
20
“मविआ सत्तेत आल्यास शेतकरी कर्जमाफी, महिलांना खटाखट ३ हजार देऊ”; राहुल गांधींची गॅरंटी

Coronavirus: कोरोनाबाधितांवर नवं संकट, म्युकरमायकोसिसनंतर आता दिसून येताहेत हे आजार 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2021 3:31 PM

Coronavirus in India: कोरोनाबाधित रुग्णांमध्ये म्युकरमायकोसिस हा आजार मोठ्या प्रमाणात दिसून आल्याने वैद्यकीय तज्ज्ञ चिंता व्यक्त करत आहेत. त्यातच आता कोरोनाबाधित रुग्णांवर नवे संकट आल्याचे दिसत आहे.

नवी दिल्ली - दुसऱ्या लाटेदरम्यान कोरोनाबाधित रुग्णांमध्ये म्युकरमायकोसिस हा आजार मोठ्या प्रमाणात दिसून आल्याने वैद्यकीय तज्ज्ञ चिंता व्यक्त करत आहेत. त्यातच आता कोरोनाबाधित रुग्णांवर नवे संकट आल्याचे दिसत आहे. (Coronavirus in India) कोरोनाच्या रुग्णांमध्ये आतड्यांमध्ये गुठळ्या होणे, तसेच गँगरिनसारख्या समस्याही दिसून येऊ लागल्या आहेत. त्यामुळे तज्ज्ञ पोटात होणाऱ्या अज्ञात दुखण्याच्या कारणांचा तत्काळ तपास करण्यास सांगत आहेत. आयसीएमआरने देशभरातील स्वतंत्र संशोधकांना कोरोनासंबंधितीच्या माहितीमध्ये त्यांच्याकडील माहितीची भर घालण्यासाठी निमंत्रित केले होते.  (A new crisis on corona Patient, The risk of gangrene increased, with cases of intestinal clots appearing)टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, मुंबईतील रुग्णालयांमध्ये फिजिशियन्स आणि सर्जन्सनी अशा एक डझनाहून अधिक रुग्णांवर उपचार केले आहेत. त्यांनी पोटात होणाऱ्या अज्ञात वेदनांबाबत इशारा दिला आहे. तसेच त्वरित तपासणीचा सल्ला दिला आहे. संशोधनातून समोर आलेल्या माहितीनुसार १६ ते ३० टक्के कोविड-१९ च्या रुग्णांमध्ये गॅस्ट्रोइन्टेस्टेनल लक्षणेही दिसून येत आहेत. ही लक्षणे अगदी सौम्य दिसतात किंवा दिसूनही येत नाहीत. कोरोना विषाणू हा फुप्फुसांप्रमाणेच गॅस्ट्रोइन्टेस्टेनल ट्रॅक्टवरही हल्ला करू शकतो. दुर्मीळ रुग्णांमध्ये कोविडमुळे आतड्यांत गुठळ्या झालेल्या दिसून येतात. त्यांना एक्यूट मेसेन्ट्रिक इस्कीमिया म्हटले जाते. एएमआयमुळे छोट्या आतड्यांतील रक्ताच्या पुरवठ्यावर परिणाम होतो. त्यामुळे गँगरिनची समस्याही निर्माण होऊ शकते. आतड्यांमध्ये गुठळ्या झाल्याची तक्रार करणारे रुग्ण गंभीर मेसेन्टेरिक इस्किमियाची शिकार होऊ शकतात. ही पोटाशी संबंधित दुर्मीळ संस्या आहे. ती आजार आणि मृत्यूदराच्या उच्चस्तराशी संबंधित आहे. वेस्क्यूलर सर्जन डॉक्टर अनिरुद्ध भुईया यांनी सांगितले की, जर यावर त्वरित उपचार केले नाहीत तर ते धोकादायक ठरू शकते.   आकडे सांगतात की, देशामध्ये म्युकरमायकोसिसचे रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडत आहेत. आतापर्यंत १२ हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच देशात असे अनेक रुग्ण असतील ज्यांची नोंद झालेली नाही, अशी भीतीही व्यक्त केली जात आहे. केंद्र सरकारसुद्धा या आजाराच्या उपचारांमध्ये वापरल्या जाणाऱ्या एम्फोटेरेसिन बी ची व्यवस्था वाढवण्यात गुंतले आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतHealthआरोग्यMucormycosisम्युकोरमायकोसिस