नवी दिल्ली - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशातील कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. (coronavirus in India) मात्र यापैकी बहुतांश कोरोनाबाधित हे सौम्य लक्षणे असणारे तसेच लक्षणे नसलेले आहेत. आता अशा कोरोनाबाधितांसाठी केंद्रीय आरोग्य आणि कुटंब कल्याण मंत्रालयाने आज नवी नियमावली प्रसिद्ध केली आहे. या नियमावलीनुसार ज्या कोरोनाबाधितांमध्ये सौम्य लक्षणे आहेत वा लक्षणे दिसत नाही आहेत, अशा रुग्णांना होम आयसोलेशनमध्ये राहावे लागेल. तसेच अशा रुग्णांच्या संपर्कात असलेल्यांना होम क्वारेंटाइन व्हावे लागेल. (New guidelines issued by the government for mild and asymptomatic corona patients, must be followed)
केंद्रीय आरोग्य आणि कुटंब कल्याण मंत्रालयाने केलेल्या सूचनेनुसार अशा कोरोनाबाधित रुग्णावर घरीच उपचार करावे लागतील. तसेच बाधित व्यक्तीच्या कुटुंबीयांनी सातत्याने डॉक्टरांच्या संपर्कात राहणे आवश्यक आहे. लक्षणे नसलेल्या आणि सौम्य लक्षणे असलेल्या कोरोना रुग्णांसाठीची नियमावली पुढील प्रमाणे आहे.
- ज्या रुग्णांना एचआयव्ही, कॅन्सरसारखे गंभीर आजार असतील किंवा अवयव प्रत्यारोपण झाले असेल अशा रुग्णांनी होम आयसोलेशनमध्ये राहण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.- जे रुग्ण ६० वर्षांवरील वयाचे आहे. तसेच ज्यांना सहव्याधी आहेत त्यांनीसुद्धा होम आयसोलेट होण्याचा निर्णय घेण्यापूर्वी डॉक्टरांची परवानगी घ्यावी. - कुटुंबातील जी व्यक्ती रुग्णाची काळजी घेईल. तसेच त्याचा निकट संपर्कात असेल अशांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार प्रोटोकॉलनुसार एचसीक्यू घ्यावे लागेल.- होम आयसोलेशनमध्ये राहणाऱ्या रुग्णांना क्रॉस व्हेंटिलेशन असलेल्या खोलीत ठेवावे. तसेच खोलीची खिडकी उघडी ठेवावी. तसेच रुग्णाने नेहमी ट्रिपल लेअर मास्क वापरावा. तसेच हा मास्क दर आठ तासांनी बदलावा.-रुग्णाची देखभाल सुरू असलेल्या खोलीत प्रवेश करताना संबंधित व्यक्तीने एन-९५ मास्क वापरला पाहिजे. मास्क बदलायचा असेल तर तो १ टक्का सोडियम हायपोक्लोराइटसोबत मास्क डिस इन्फेक्ट केल्यावर तो फेकून द्यावा. - होम आयसोलेशनमध्ये राहणाऱ्या रुग्णाच्या भोजनात अधिकाधिक पातळ पदार्थांचा समावेस करावा. तसेत घरी राहणाऱ्यांना अधिकाधिक आराम करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. - ब्लड ऑक्सिजन सेचुरेशनला मॉनिटर करण्यासाठी प्लस ऑक्सिमीटरचा वापर करणे अनिवार्य आहे. त्यासह दररोज दर चार तासांनी शरीराचे तापमान तपासणे आवश्यक आहे. - रुग्णाला एकाच खोलीत राहावे लागेल. तसेच त्याने कुटुंबातील अन्य व्यक्तींपासून आवश्यक अंतर ठेवणे आवश्यक आहे. तसेच त्याने वयस्कर आणि आजारी व्यक्ती आपल्या संपर्कात येणार नाहीत, याची विशेष खबरदारी घेतली पाहिजे. - रुग्णाने अधिकाधिक आराम करावा. तसेच शरीरातील पाणी कमी होऊ नये यासाठी पुरेशा प्रमाणात द्रव पदार्थांचे सेवन करावे. रुग्णाने खोकताना तसेच शिंकताना विशेष खबरदारी घ्यावी. प्रत्येकवेळी आवश्यक मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे. - रुग्णाने दिवसातून दोनवेळा कोमट पाण्याने गुळण्या कराव्यात. तसेच वाफ घेण्याचा सल्ला देण्यात येत आहे. - रुग्णाला श्वास घेण्यासाठी त्रास होत असेल, ऑक्सिजनची पातळी ९४ टक्क्यांच्या खाली आली असेल, छातीत वेदना होत असतील तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. - कोरोनाचे लक्षण समोर आळ्यानंतर किमान दहा दिवसांनंतर होम आयसोलेशन संपुष्टात आणण्यात येऊ शकते. मात्र सलग तीन दिवस ताप येत नसेल तरच असा निर्णय घेता येऊ शकतो.