शहरं
Join us  
Trending Stories
1
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
2
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
3
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींची हवा संपली, रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”
4
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
5
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
6
शेअर बाजारातील घसणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल 
7
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
8
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल
9
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
11
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
12
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
13
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
14
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
15
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
16
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
17
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
18
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
19
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब

देशात नव्या कोरोना स्ट्रेनची पुष्टी; भारत-इंग्लंडदरम्यानची उड्डाणे 31 डिसेंबरनंतरही राहणार रद्द, उड्डाणमंत्र्यांचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2020 4:21 PM

नागरी उड्डाण मंत्रालयाने कोरोना व्हायरसचा नवा प्रकार (स्ट्रेन) सामोर आल्याच्या पार्श्वभूमीवर 23 ते 31 डिसेंबरपर्यंत भारत आणि इंग्लंडदरम्यानची उड्डाणे स्थगित केली आहेत.

नवी दिल्ली -इंग्लंडमधून भारतात आलेल्या 6 प्रवाशांत कोरोना व्हायरसचे नवे स्वरूप (स्ट्रेन) आढळून आले आहे. यातच आता, भारत आणि इंग्लंडदरम्यान रद्द करण्यात आलेली विमान सेवा आणखी काही दिवस रद्दच ठेवावी लागेल, असे मलावाटते, असे नागरी उड्डाणमंत्री हरदीप सिंग पुरी यांनी म्हटले आहे. 

नागरी उड्डाण मंत्रालयाने कोरोना व्हायरसचा नवा प्रकार (स्ट्रेन) सामोर आल्याच्या पार्श्वभूमीवर 23 ते 31 डिसेंबरपर्यंत भारत आणि इंग्लंडदरम्यानची उड्डाणे स्थगित केली आहेत. आता 31 डिसेंबरनंतरही ही उड्डाणे रद्दच राहू शकतात. इंग्लंडमध्ये आढळून आलेला कोरोना व्हायरसचा हा नवा प्रकार अत्यंत वेगाने पसरत चालला आहे. एवढेच नाही, तर तो अधिक संक्रमक असल्याचेही बोलले जात आहे.

सहा जणांना कोरोनाच्या नव्या प्रकाराची लागण -इंग्लंडमध्ये आढळून आलेल्या कोरोनाच्या नव्या प्रकाराने जगभरात कहर केला असतानाच आता भारतातही नव्या कोरोनाचा शिरकाव झाल्याचे समोर येत आहे. इंग्लंडमधून भारतात परतलेल्या 6 जणांना कोरोनाच्या नव्या प्रकाराची लागण झाल्याची माहिती केंद्र सरकारकडून देण्यात आली आहे. केंद्र सरकारने आज (मंगळवारी) दिलेल्या माहितीनुसार, इंग्लंडमधून परतलेल्या 6 जणांमध्ये कोरोनाच्या नव्या प्रकाराची लागण झाली आहे. यामध्ये 3 नमुने बेंगळुरू, 2 नमुने हैदराबाद आणि 1 नमुना पुण्यातील प्रयोगशाळेतील असल्याचेही सरकारकडून सांगण्यात आले आहे.  

कोरोनाच्या नव्या प्रकाराची लागण झालेल्या सर्व 6 जणांना सेल्फ आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. तसेच या 6 जणांच्या संपर्कात आलेल्या सर्वांना क्वारंटाइन करण्यात आले असून, अन्य सहप्रवाशांचा शोध सुरू असल्याचे सांगितले जात आहे. 

देशभरातील प्रयोगशाळांमध्ये तपासणी सुरू -आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, 25 नोव्हेंबर ते 23 डिसेंबर या कालावधीत इंग्लंडहून सुमारे 33 हजार प्रवासी भारतात आले आहेत. सर्वांची तपासणी करण्यात आली. यातील 114 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. यानंतर देशभरातील सुमारे 10 प्रयोगशाळांमध्ये हे नमुने पाठवण्यात आले असून, यात कोलकाता, भुवनेश्वर, एनआयव्ही पुणे, सीसीएस पुणे, सीसीएमबी हैदराबाद, सीसीएफडी हैदराबाद, इन्स्टेम बंगळुरू, एनआयएमएचएएनएस बंगळुरू, आयजीआयबी दिल्ली आणि एनसीडीसी दिल्ली या प्रयोगशाळांचा समावेश आहे. 

इंग्लंडमधील शास्त्रज्ञांच्या दाव्यानुसार, कोरोनाच्या नवीन प्रकाराचा फैलाव 70 टक्के अधिक वेगाने होतो. आतापर्यंत जगभरातील 16 देशांमध्ये कोरोनाच्या नव्या प्रकाराचा संसर्ग झाला आहे. नव्या प्रकारच्या कोरोनाला रोखण्यासाठी भारतासह अनेक देशांनी इंग्लंडमुधून होणारी विमान उड्डाणे स्थगित केली आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याairplaneविमानEnglandइंग्लंड