शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

CoronaVirus News: धक्कादायक! ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे १२ कोरोना रुग्णांचा तडफडून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2021 8:58 AM

CoronaVirus News: मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमधील घटना; मृत रुग्णांच्या नातेवाईकांकडून संताप व्यक्त

भोपाळ: देशात कोरोना रुग्णांचा झपाट्यानं वाढत आहे. दोन आठवड्यांपूर्वी देशात पहिल्यांदा एका दिवसात कोरोनाचे १ लाख नवे रुग्ण आढळून आले. त्यानंतर १० दिवसांमध्ये हा आकडा २ लाखांच्या पुढे गेला. काल देशात जवळपास पावणे तीन लाख कोरोना रुग्णांची नोंद झाली. कोरोना रुग्णांची संख्या वेगानं वाढत असताना दुसरीकडे ऑक्सिजन, रेमडेसिविरचा तुटवडा जाणवू लागला आहे.१ मेपासून १८ वर्षांवरील सर्वांना लस; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया एका क्लिकवरऑक्सिजन पुरवठा खंडित झाल्यामुळे मध्य प्रदेशातल्या शहडोलमध्ये १२ जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना आता असाच प्रकार भोपाळमध्ये घडला आहे. पीपल्स रुग्णालयात ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे १० ते १२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे रुग्णालयाच एकच खळबळ उडाली. मात्र या वृत्ताचं रुग्णालय प्रशासनानं खंडन केलं आहे. ऑक्सिजन पुरवठा काही वेळासाठी खंडित झाला होता. मात्र त्यामुळे रुग्णांचा मृत्यू झालेला नाही, असं स्पष्टीकरण प्रशासनानं दिलं.लवकरच नवा नियम; किराणा दुकाने केवळ सकाळी ७ ते ११ पर्यंतपीपल्स रुग्णालयात ऑक्सिजनची कमतरता असल्याची तक्रार रुग्णांचे नातेवाईक अनेक दिवसांपासून करत होते. रुग्णालयातील कर्मचारी या गोष्टीची माहिती देऊन रुग्णांना दाखल करून घेत होते. ऑक्सिजनं प्रमाण पुरेसं नसल्यानं रात्री उशिरा किंवा सकाळी ऑक्सिजन संपून जातो. सोमवारी सकाळच्या सुमारास ऑक्सिजनचा पुरवठा खंडित झाल्यानं १० ते १२ रुग्णांचा मृत्यू झाल्याचं समजतं. रुग्णालय प्रशासनानं हे वृत्त फेटाळून लावलं. ऑक्सिजन पुरवठा कमी-जास्त होत असतो. मात्र रुग्णांच्या मृत्यूला ऑक्सिजनचा तुटवडा जबाबदार नाही. प्रकृती खालावल्यानं त्यांचा मृत्यू झाला आहे, असं स्पष्टीकरण रुग्णालयानं दिलं आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या