नवी दिल्ली: देशात आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं हाहाकार माजवला आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात देशात पहिल्यांदा एका दिवसात १ लाख नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. यानंतर अवघ्या अडीच आठवड्यांत हा आकडा ३ लाखांच्या पुढे गेला. गेल्या ६ दिवसांपासून देशात दररोज ३ लाखांहून अधिक कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा राष्ट्रव्यापी लॉकडाऊन लागू होणार का याबद्दल चर्चा सुरू झाली. मात्र देशव्यापी लॉकडाऊन लागण्याची शक्यता कमी असून जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन लागू करण्याची तयारी केंद्रानं सुरू केली आहे.राज्यात कडक निर्बंध 10 दिवस वाढणार?; आज मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयगेल्या वर्षी कोरोनाची पहिली लाट आली असताना देशात लॉकडाऊन लागू करण्यात आला. याचा थेट फटका अर्थव्यवस्थेला बसला. त्यामुळे आता जिल्हा स्तरावर लॉकडाऊन लागू करण्याचा विचार केंद्राकडून सुरू आहे. त्यानुसार आरोग्य मंत्रालयानं एक प्रस्ताव तयार केला आहे. कोरोना संक्रमणाचा दर १५ टक्के असलेल्या जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन करण्याची शिफारस मंत्रालयाकडून करण्यात आली आहे. या लॉकडाऊनमधून अत्यावश्यक सेवा वगळल्या जातील.राज्यात तिसऱ्या लाटेचा धोका कायम; निर्बंध कायम ठेवावे लागतील, कोरोना टास्क फोर्सचे मतकोरोना संक्रमणाचा दर १५ टक्के असलेल्या जिल्ह्यांची संख्या १५० इतकी असू शकते. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत या प्रस्तावावर चर्चा झाली. केंद्र सरकार राज्य सरकारांशी चर्चा करून याबद्दलचा अंतिम निर्णय घेईल. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी लवकरच या संदर्भात महत्त्वाचा निर्णय होऊ शकतो. महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. त्यातच विदर्भ, मराठवाड्याच्या अनेक जिल्ह्यांमधील परिस्थिती चिंताजनक आहे. त्यामुळे या भागातील अनेक जिल्ह्यांचा समावेश आरोग्य मंत्रालयाच्या प्रस्तावात असू शकतो.आरोग्य मंत्रालयाकडून केंद्राला एक प्रस्ताव देण्यात आला आहे. कोरोना पॉझिटिव्हिटीचा दर १५ टक्क्यांहून अधिक असलेल्या जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन गरजेचा असल्याचं यामध्ये नमूद करण्यात आलं आहे. अत्यावश्यक सेवा वगळून या जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन लावला लागले. अन्यथा इथल्या आरोग्य सुविधांवर खूप मोठा ताण येईल, असा सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. काही आठवड्यांचा लॉकडाऊन केल्यास कोरोनाची साखळी तोडता येईल, असं आरोग्य मंत्रालयानं प्रस्तावात म्हटलं आहे.
CoronaVirus Lockdown News: 'त्या' १५० जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन लावण्याच्या हालचाली; महाराष्ट्रातील किती जिल्हे?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2021 8:58 AM