हरिद्वार: हरिद्वारमध्ये कोरोना व्हायरस संसर्गाचा (कोविड -१९) विस्फोट होण्याची शक्यता आहे, कारण येथील एका मल्टीनॅशनल कंपनीतील २८८ कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. हे कर्मचारी वेगवेगळ्या भागात राहत होते. तसेच, ते सामान्य लोकांच्या संपर्कात आल्याचेही सांगितले जात आहे. प्रशासन आता या मल्टीनॅशनल कंपनीतील कर्मचाऱ्यांची कॉन्टेक्ट हिस्ट्री तपासून पाहत आहे. याशिवाय. याच कंपनीतील इतर ४०० कर्मचाऱ्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. याचा रिपोर्ट येणे अद्याप बाकी आहे.
मीडियाच्या रिपोर्टनुसार, कोरोना विषाणूच्या संसर्गाची स्थिती पाहता कंपनीच्या आजू-बाजूचा परिसर रिकामा करण्यात आला आहे. माध्यमांना माहिती देताना प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सांगितले की, "कंपनीतील २88 कर्मचारी कोरोना बाधित झाले आहेत. इतर ४०० कर्मचाऱ्यांचा अहवाल येणे बाकी आहे. कंपनीच्या कर्मचाऱ्यांना संसर्ग झाल्यानंतर, त्यांची कॉन्टेक्ट हिस्ट्री आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध घेण्यासाठी १६४ लोकांची टीम कामाला लागली आहे."
डॉक्टरांची सर्वात मोठी संस्था इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) देशातील वाढत्या कोरोनाच्या या समस्येबद्दल इशारा दिला आहे. आयएमएने म्हटले आहे की, 'देशात हा समूह संसर्ग पसरला आहे. देशातील परिस्थिती अत्यंत वाईट आहे.' विशेष म्हणजे, कोरोनाने जगाला विळखा घातला आहे. संपूर्ण जग सध्या कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहेत. अनेक देशांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून जगभरातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल एक कोटीचा टप्पा पार केला आहे. तर सहा लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. जगभरात अमेरिका आणि ब्राझिलनंतर सर्वाधिक कोरोना प्रकरणांत भारत तिसर्या क्रमांकावर आहे.
देशात कोरोनाचा धोका वाढला असून गेल्या २४ तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ झाली आहे. तसेच चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. देशातील रुग्णसंख्येने आतापर्यंतचा उच्चांक गाठला असून अकरा लाखांचा टप्पा पार केला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सोमवारी (२० जुलै) दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ४०, ४२५ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर ६८१ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ११ लाख १८ हजार ४३ वर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा २७,४९७ वर पोहोचला आहे.
आणखी बातम्या...
दूध आंदोलनाला राज्यात सुरुवात, दगडाला अभिषेक घालून केंद्र आणि राज्य सरकारचा निषेध
मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांना कोरोनाची लागण
रावणाने पहिले विमान उड्डाण केले, सिद्ध करण्याचा श्रीलंकेचा दावा
सरकारी कर्मचार्यांसाठी खूशखबर! नाईट शिफ्ट केली तर आता असा होणार फायदा...
ठाण्यातील मुख्य बाजारपेठेत पालिकेच्या विशेष पथकाची कारवाई, ५ टेम्पो जप्त