नवी दिल्ली : चीनमधील एका लष्करी विद्यापीठाने दिलेल्या माहितीनुसार, तेथील कोरोनाबाधित आणि बळींचा आकडा सांगितल्यापेक्षा कितीतरी अधिक आहे. चांगशा सिटीतील राष्ट्रीय संरक्षण तंत्रज्ञान विद्यापीठाच्या मते चीनमधील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ८४ हजार नसून ६ लाख ४० हजार इतका आहे. चीनकडून सांगितल्या जात असलेल्या संख्येबाबत जागतिक समुदायाकडून आधीपासूनच संशय व्यक्त केला जात आहे. याला तेथील सत्ताधाऱ्यांचे लपवाछपवीचे धोरण कारणीभूत आहे.विद्यापीठाच्या आकडेवारीनुसार, हे ६ लाख ४० हजार बाधित २३० शहरांमध्ये पसरलेले आहेत. फेब्रुवारी ते एप्रिल या कालखंडातील आढळलेल्या प्रत्येक रुग्णाच्या प्रत्यक्ष ठिकाणाची माहिती विद्यापीठाकडे आहे. कोरोनातून बरे झालेल्यांची आकडेवारीही त्यात आहे.चीनमध्ये संसर्गाचे मुख्य केंद्र ठरलेल्या वुहान प्रांताची खरी आकडेवारी जगासमोर मांडलेलीच नाही, असाही आरोप चीनवर होत आला आहे; परंतु चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजान यांनी पत्रक काढून चुकीची आकडेवारी सांगितल्याच्या बाबीचे खंडन केलेहोते.अमेरिकेपेक्षा चीन पुढेमागील महिन्यात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आरोप केला होता की, कोरोनाबाधित आणि बळींच्या बाबतीत चीन अमेरिकेच्या खूप पुढे आहे. हा चीनचा आकडा जगात सर्वाधिक आहे.चीनच्या मते संख्येबाबत भारताची चीनवर मात;रुग्णसंख्या ८५ हजारांच्या वर; मृत्यूदर कमी- कोरोना रुग्णांच्या संख्येबाबत भारताने शनिवारी चीनवर मात केली आहे. चीनमधील कोरोना रुग्णांची संख्या ८४ हजारांपेक्षा अधिक आहे. भारतात आता कोरोना रुग्णांची संख्या ९० हजारांच्या वर पोहोचली आहे. मात्र, भारतातील मृत्यूदर चीनपेक्षा कमी आहे.- केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शनिवारी सकाळी देशातील कोरोना रुग्णांची आकडेवारी जाहीर केली. देशामध्ये शुक्रवारी या आजाराचे ३,७८७ नवे रुग्ण आढळून आले तसेच आणखी १०५ जणांचा मृत्यू झाला होता. सध्या देशात ५३,५४८ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत, तर उपचारांंनंतर पूर्णपणे बरे झालेल्यांची संख्या ३४,२२४ इतकी आहे.लॉकडाउनच्या काळात लागू केलेले निर्बंध केंद्र सरकारने शिथिल केल्यानंतरच्या दुसºया दिवशी, म्हणजे ३ मेपासून कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट होण्यास सुरुवात झाली.या तारखेला ४० हजार असलेली रुग्णांची संख्या त्यानंतर काही दिवसांतच ९० हजारांच्या वर जाऊन पोहोचली आहे. या आजारापायी चीनमध्ये ५.३ टक्के इतका मृत्यूदर होता. मात्र, भारतामध्ये हे प्रमाण कमी म्हणजे ३.५ टक्केच आहे, ही एक चांगली बाब आहे.
CoronaVirus News : चीनमध्ये ८४ हजार नव्हे, ६ लाख ४० हजार रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2020 6:37 AM